Lok Sabha : साताऱ्यात भाजपचा उमेदवार ठरला! गिरीश महाजनांकडून 'या' नेत्याच्या नावाचे संकेत

इम्तियाज मुजावर

18 Mar 2024 (अपडेटेड: 18 Mar 2024, 03:32 PM)

Satara Lok Sabha Constistuency : गिरीश महाजन यांनी आज उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर महाजन भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी गिरीश महाजनांची दोन्ही नेत्यांसोंबत त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी बंददाराआड चर्चा झाली.

satara lok sabha constituency girish mahajan meet udayanraje bhosale shivendra raje bhosale narendra patil maharashtra loksabha constituency

उदयनराजेंना तर तिकीट मागण्याची गरजच नाही, त्यांचं तिकीट निश्चित आहे.

follow google news

Satara Lok Sabha Constistuency : माढ्याच्या तिढ्यावर चर्चा केल्यानंतर ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक साताऱ्याचा तिढा सोडवण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी गिरीश महाजन (girish Mahajan) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) आणि शिवेंद्रराजे (shivendra raje) या दोन नेत्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांसोबत गिरीश महाजनांची बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी नेमका कोणता उमेदवार साताऱ्यातून लोकसभा लढवणार याचे नावचं जाहीर केले आहे.  (satara lok sabha constituency girish mahajan meet udayanraje bhosale shivendra raje bhosale narendra patil maharashtra loksabha constituency ) 

हे वाचलं का?

खरं तर सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांनी तयारी सुरु केली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र पाटील इच्छुक आहेत. आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्हालाच तिकीट मिळणार असे सांगून कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे साताऱ्यात महायुतीवरून त्रांगड निर्माण झाले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी आज गिरीश महाजन साताऱ्याल दाखल झाले होते.  

हे ही वाचा  : खरंच अशोक चव्हाण सोनिया गांधींसमोर रडले का?

गिरीश महाजन यांनी आज उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर महाजन भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी गिरीश महाजनांची दोन्ही नेत्यांसोंबत त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी बंददाराआड चर्चा झाली. यामध्ये उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्या भूमिकेबाबत व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवेंद्र राजेंची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे. आमची सविस्तर चर्चा झाली. तसेच काहीच दिवसांपूर्वी नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजेंची भेट घेतली होती. या भेटीवर महाजन म्हणाले, इच्छुक उमेदवार तर सगळीकडेच असतात, त्यांच काम सगळ्यांना भेटण आहे. सातारा लोकसभेची तिढा सुटला नाही.  कारण अजून जागावाटपही झाले नाही आणि फॉर्म भरायलाही सुरुवात झाली नाही. आता इतक्या चुटकी सरशी काम असतं तर अख्ख्या महाराष्ट्रात मलाच पाठवलं असतं, असे महाजन यांनी सांगितले. तसेच शिवेंद्र राजेंची लोकसभेची काही मागणी नाही, असे देखील महाजनांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा  : Electoral Bonds : 'तीन दिवसांत...', सुप्रीम कोर्टाने एसबीआयची केली कानउघाडणी

या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रराजे म्हणाले की, आम्ही पक्षाला हेच सांगितलं आहे, भाजपकडेच उमेदवारी राहिली पाहिजे. कारण या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे जागा ही भाजपकडेच रहावी, तसा निरोप गिरीश महाजनांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आणि तो दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवा. तसेच लोकसभेसाठी मी कोणतेही नाव सुचवले नाही, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या उमेदवारासाठी आम्ही प्रचार करू, असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले आहे.

उदयनराजेंसोबतच्या भेटीनंतर महाजन पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की,  तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी चाललेल्या आहेत. उदयनराजेंना तर तिकीट मागण्याची गरजच नाही, त्यांचं  तिकीट निश्चित आहे. आणि त्यांचं तिकीट नाकारण्याचा विषयच येत नाही आहे. त्याबाबत काही कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळे उदयनराजेंचं तिकीट निश्चित असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे. 

उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल पत्रकारांनी विचारले असता महाजन म्हणाले की, हा तिढा साताऱ्याबद्दल नाही. भाजपा पक्ष व निवडणुकीच्या काळामध्ये आमचे सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी उदयनराजे यांचा राज्यभर कसा उपयोग होईल याबाबत चर्चा करण्यासाठी मी सातारा येथे आलो होतो असल्याचे महाजन यांनी सांगितले. 

दरम्यान गिरीश महाजन यांनी जरी उदयनराजेंचं तिकीट निश्चित म्हटलं असलं तरी याबाबतचा निर्णय़ आता दिल्लीतून होणार आहे. त्यामुळे कदाचित तिसऱ्या यादीत गिरीश महाजन यांचे नाव येण्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp