गाझियाबाद: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गाझियाबादच्या थाना ट्रोनिका सिटी परिसरात मंगळवारी झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी रवींद्र आणि अरुण यांचा पोलिसांनी थेट एन्काउंटर करून त्यांना यमसदनी धाडलं. ही संयुक्त कारवाई उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (STF), दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्स यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
मृत संशयितांची ओळख पटली असून ते रोहतकमधील कहानी येथील रहिवासी रवींद्र उर्फ कल्लू आणि सोनीपतमधील गोहना रोड येथील रहिवासी अरुण हे आहेत. दोन्ही गोळीबार करणारे कुख्यात गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदाराच्या गँगचे सक्रिय शूटर होते. एन्काउंटरनंतर घटनास्थळावरून ग्लॉक आणि जिगाना पिस्तूल आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
हे ही वाचा>> 55 वर्षांच्या महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध! रागाच्या भरात पत्नी नको ते करून बसली अन्... नेमकं काय घडलं?
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचा एन्काउंटर
12 सप्टेंबर रोजी पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास, दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी दिशा पटानी हिच्या बरेली येथील घरी तब्बल 9 राउंड गोळीबार केला होता. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. हल्ल्यानंतर, टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली आणि असा दावा केला की हा दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिने धार्मिक व्यक्ती प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा बदला होता.
दरम्यान, गोळीबार करणाऱ्यांविरोधातील ही कारवाई उत्तर प्रदेश एसटीएफ, दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि हरियाणा एसटीएफने संयुक्तपणे केली.
हे ही वाचा>> लातूर हादरलं! वडिलांनी फीसाठी पैसे न दिल्याने लेकाची सनकली, जन्मदात्या वडिलांना लाकडाने मारहाण करत संपवलं
या घटनेनंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिशा पटानीचे वडील आणि माजी डीएसपी जगदीश पटानी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि कुटुंबाला सुरक्षेचे आश्वासन दिले. पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्यासाठी 2500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या चकमकीमुळे तपास जलद होईल आणि इतर टोळी सदस्यांना लवकरच अटक केली जाऊ शकते.
दरम्यान, दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः दखल घेतली होती आणि या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. ज्यानंतर आज (17 सप्टेंबर) दोन्ही आरोपींचं एन्काउंटर करण्यात आलं.
ADVERTISEMENT
