Crime News : समुद्रकिनाऱ्याजवळ एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामुहिक लैंगिक शोषण केल्याचं धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. तरुणी ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत बलिहरचंडी येथील मंदिराजवळ बसली होती तेव्हाच स्थानिक तरुणांनी त्या प्रेमयुगुलांचे फोटो काढत व्हिडिओ बनवले होते. त्यानंतर त्यांनी पैशांची मागणी केली होती. ही घटना ओडिशातील पुरी येथील असल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला, UBT शिवसैनिक आक्रमक, नेमकं काय घडलं?
जोडपे एकांतात बसले असताना...
संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, हे जोडपे एकांतात बसले असताना काही तरुणांनी त्यांचे फोटो काढले. नंतर पैशांची देखील मागणी केली. पण, त्यांनी पैसेच दिले नाही. त्यानंतर तरुणांनी पीडित तरुणीवरच दोघांनी मिळून बलात्कार केला. तर काही लोकांना तिच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली होती आणि नंतर झाडाला बांधले. ही घटना शनिवारी दुपारी घडली होती. परंतु सोमवारी सायंकाळी पुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
नराधमांना अटक
संबंधित प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपीचा शोध सुरु असल्याचं सांगण्यात येत नाही. सिंग म्हणाले की, मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचप्रसंगी या घटनेला राजकीय रंग दिला जात असल्याचं बोललं जातंय.
हे ही वाचा : साताऱ्यात जन्मलेल्या चार बाळांना दत्तक देण्याची मागणी, बाळांच्या मावशीनेच केला धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
काही वर्षांपूर्वी दिल्लीतही अशीच घटना घडली होती. एका प्रियकर आणि प्रेयसी वेळ घालवत होते. तेव्हाच काही नराधमांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला मारहाण करत तरुणीवर लैंगिक शोषण केलं होतं. या घटनेनं दिल्ली पूरती हादरून गेली होती. अशा घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशात दररोज अशा घडामोडी घडताना दिसतात. एवढंच नाही,तर मुली स्वत:च्या घरी देखील सुरक्षित नसल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
