Rape Case: बिहारच्या नवादामध्ये नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे, एका अल्पवयीन मुलीसोबत तिच्या दाजीने घृणास्पद कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर जात होती. वाटेतच तिला तहान लागली. तेव्हा तिला तिचा दाजी दिसला आणि तिने त्याच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितली. त्यावेळी, दाजीने आपल्या मेहुणीला दारू मिसळलेलं पाणी प्यायला दिलं. तेव्हा, तरुणीला गरगरायला लागल्यानंतर तिचा दाजी तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी, आधीच आरोपीचे तीन मित्र उपस्थित होते. त्यानंतर, चौघांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.
ADVERTISEMENT
निर्जनस्थळी पीडितेसोबत घृणास्पद कृत्य
पोलिसांनी यासंबंधी तातडीने कारवाई करत आरोपीला पकडण्यासाठी छापे टाकण्यास सुरूवात केली. पोलिसांनी चार आरोपींपैकी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींची तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील किशोरी नावाच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत काही तरुणांनी घृणास्पद कृत्य केलं. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे.
घटनेच्या दिवशी पीडिता तिच्या मैत्रिणींसोबत शेतात लाकडे गोळा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला तहान लागली आणि तिने तिच्या दाजीकडून पाणी मागितलं. तिच्या दाजीने आणि त्याच्या इतर मित्रांनी तिला पाण्याऐवजी जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर ते तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
हे ही वाचा: महिलेनं 15 वर्षांच्या मुलाला दिली 'ती' धमकी! नंतर मंदिरात नेलं अन् थेट लग्नच... नेमकं प्रकरण काय?
आरोपीने केला गुन्हा कबूल
पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की 13 सप्टेंबर रोजी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वारिसलीगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोक्सो अॅक्ट अंतर्गत इतर कलमांखाली आरोप करण्यात आले आहेत. एसपींच्या आदेशानुसार, पकरीबरावा एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि छापा टाकण्यात आला. या छाप्यात एका आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं. संबंधित आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
हे ही वाचा: धारावी पाठोपाठ ठाण्यातही अदानी ग्रूपला मोठा विरोध, सिमेंट कपंनीचं नेमकं प्रकरण काय?
इतर आरोपींचा तपास सुरू
अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय आरोपीची ओळख रेणू कुमार अशी आहे. पीडितेला तिच्या कुटुंबियांसह पोलीस कोठडीत सदर रुग्णालयात पाठवण्यात आलं असून तिची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या घटनेत समाविष्ट असलेल्या इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक छापे टाकत आहे.
ADVERTISEMENT
