Actress sanchita ugale suicide case : नालासोपारा येथील 22 वर्षीय टीव्ही अभिनेत्री संचिता उगाले हिच्या आत्महत्येने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. संचिताने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. 'दिलवाली दुल्हा ले जाएगी', 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया' यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि 'छावा' चित्रपटात अभिनय करणाऱ्या संचिताच्या अकाली मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, संचिताच्या निधनानंतर तिच्या मावशीने आणि वडिलांनी सिनेसृष्टीतील काही लोकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रक्ताने माखलेली बेडशीट अन् दारुच्या बाटल्या, होमस्टेमध्ये महिला IT कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?
संचिताच्या मावशीचे सनसनाटी आरोप
संचिताच्या मावशीने माध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, गेल्या दोन-चार महिन्यांपासून संचिता अत्यंत चिंतेत होती. तिला इंडस्ट्रीतील काही लोकांकडून सतत मानसिक त्रास केला जायचा आणि टॉर्चर केले जात होते. जर तिने हा त्रास आधीच सांगितला असता, तर आम्ही वेळीच पाऊल उचलले असते, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा : पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया समोर
अभिनेत्रीचे वडील काय म्हणाले?
दुसरीकडे, संचिताचे वडील आपल्या मुलीच्या आठवणीने दुःखी झाले असून, त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. संचिता आनंदी स्वभावाची होती, मात्र अचानक ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली होती, हे लक्षात आल्यावर वडील स्वतः तिच्यासोबत दररोज प्रवासात सोबत असायचे. त्यांनी असा आरोप केला की, कामाच्या ठिकाणी पैशांच्या व्यवहारावरून किंवा अन्य कारणांमुळे तिला सतत हॅरेसमेंट आणि मानसिक दबाव दिला जात होता. माझ्या मुलीला काय त्रास होता हे जगासमोर आलेच पाहिजे आणि केवळ माझ्याच नाही, तर इतर सर्वच मुलींना न्याय मिळाला पाहिजे, अशी कळकळीची विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सह-कलाकार जेसिकानेही भावना केल्या व्यक्त
या घटनेवर संचिताची सह-कलाकार जेसिका हिनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. संचिता ही अत्यंत खंबीर आणि सकारात्मक विचारांची मुलगी होती, अशा शब्दांत तिने आपल्या मैत्रिणीचे वर्णन केले. ती आत्महत्या करूच शकत नाही, असे सांगत असतानाच तिने सिनेसृष्टीतील कामाच्या पद्धतीवर (Work System) बोट ठेवले आहे. कलाकारांवर असा मानसिक दबाव येऊ नये, यासाठी कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित आणि पोषक वातावरण असणे आवश्यक असल्याचे तिने म्हटले आहे. आचोले पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, संचिताला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या या आरोपांची खातरजमा केली जात आहे.
ADVERTISEMENT











