'खरी हिंदू आहे, बीफ नाही खात', Kangana Ranaut का होतेय ट्रोल?

रोहिणी ठोंबरे

08 Apr 2024 (अपडेटेड: 08 Apr 2024, 04:18 PM)

Kangana Ranaut Have to Face Trolling : कंगना रानौतने (Kangana Ranaut) काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, 'कंगनाला बीफ आवडतं आणि भारतीय जनता पक्षाने तिला तिकीट दिलं आहे.'

Mumbaitak
follow google news

Kangana Ranaut Have to Face Trolling : कंगना रानौतने (Kangana Ranaut) काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, 'कंगनाला बीफ आवडतं आणि भारतीय जनता पक्षाने तिला तिकीट दिलं आहे.' आता यावर कंगनाने प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, 'मी बीफ किंवा रेड मीट खात नाही. काही लोक माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत.' तिच्या ट्विटवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळतात. काही लोकांनी कंगनाचे जुने ट्वीट देखील शेअर केले आहे ज्यामध्ये गोमांस खाण्यात काही चुकीचं नाही असं लिहिलं होतं. (Kangana Ranaut on her controversy and trolling about eating beef)

हे वाचलं का?

लोक इमेज खराब करत आहेत- कंगना रनौत

कंगना रनौतने ट्विट केले आहे की, 'मी बीफ किंवा कोणत्याही प्रकारचे रेड मीट खात नाही. ही लाजिरवाणी गोष्ट असून माझ्याबद्दल निराधार बातम्या पसरवल्या जात आहेत. मी अनेक दशकांपासून योगिक आणि आयुर्वेदिक जीवन जगण्याचा सल्ला देत आहे. अशा डावपेचांनी माझी इमेज खराब होणार नाही. माझे लोक मला ओळखतात आणि त्यांना माहित आहे की मला हिंदू असल्याचा अभिमान आहे, त्यांना कशानेही तुम्ही गोंधळात टाकू शकत नाही. जय श्री राम.'

कंगना जुन्या ट्वीटवरून होतेय प्रचंड ट्रोल

ट्विटवर अनेकांनी कंगनाचे जुने स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. यामध्ये कंगनाने लिहिले होते की, 'बीफ खाण्यात काहीही चुकीचं नाही आहे.' कंगनाच्या हँडलवरून हे मे 2019 मध्ये ट्विट केले होते, 'गोमांस किंवा कोणतेही मांस खाण्यात काहीही गैर नाही.' माहितीनुसार, 8 वर्षांपूर्वी कंगनाने शाकाहारी होण्याचा ऑप्शन निवडला. ही गोष्ट धर्माची नाही. ती फक्त एका धर्मावर विश्वास ठेवत नाही. दुसरे म्हणजे तिचा भाऊ मांस खातो.

कंगनाने खाल्ले होते स्टेक्स

कंगनाने अनेकदा सांगितले आहे की ती आता शाकाहारी झाली आहे. याआधी एका मुलाखतीत तिने बीफ खाण्याबाबत म्हणाली होती की, 'ती स्टेक्स (बीफपासून बनवलेली डिश) खाते पण तिच्या कुटुंबात ते खाण्याला नकार आहे. मात्र, तिला ज्या गोष्टीला नकार आहे त्या गोष्टी आवर्जून करायला आवडतात. म्हणूनच ती स्टेक्स खाते.'

    follow whatsapp