Rakhi Sawant On Nitish kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचा बुरखा ओढल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथील एका आयोजित करण्यात आलेल्या एका सरकारी सन्मान सोहळ्यात घडली होती. याच सोहळ्यात नितीश कुमार यांनी केलेल्या कृत्याने देशभरात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. हिजाब हटवल्याचे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने ते तुफान व्हायरल देखील होत आहे. यावर आता राखी सावंतने नितीश कुमार यांना चांगलंच सुनावलं आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चांगला समाचार घेतला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अटकेची टांगती तलावर, कृषी खातं गेलं आता थेट मंत्रिपदच जाणार?.. नेमके कोण आहेत माणिकराव कोकाटे?
नेमकं काय म्हणाली राखी सावंत?
नमस्कार नितीश कुमारजी. तुमचे पाय धरते. तुमचा पाय हा माझ्या डोक्यावर सदैवपणे राहूदे. मी तुमचा आदर करते. आपण चांगले नेते असून आपण एक चांगले पती आणि वडील देखील आहात. पण, तुम्ही हे काय करून बसला नितीशजी? जर मी तुमच्यापाशी आले आणि सगळ्यांसमोर तुमचं धोतर खेचलं, पॅन्टचा नाडा ओढला तर चालेल का? एका मुस्लिम महिलेला तुम्ही बोलावून पुरस्कार देता, तिचा तुम्ही सन्मान देखील करता. पण, तुम्हाला ज्ञान नाही का की, मुस्लिम धर्मात एखादी महिला व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा तिच्या कपड्यांना कोणी हात लावत नाही.
हे ही वाचा : सरफराजला 'सीएसके'नं दिली संधी, शेअर केलेल्या व्हिडिओनं काळजाचं झालं पाणी, म्हणाला 'माझ्या करिअरला नवं..'
तुम्ही दिग्गज नेते असून हे..
आपण इतके दिग्गज नेते असून तुम्ही हे काय केलंत? असा प्रश्न राखीने केला होता. नंतर ती म्हणाली की, तुम्ही एका महिलेचा नकाब ओढताय. ही किती निंदणीय आणि चुकीची गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या महिलेला इज्जत देता आणि नंतर तिच इज्जत काढून घेता. आपल्याला लाज कशी वाटली नाही. मीडियासमोर बहिणीच्या नात्याने तिची माफी मागा. मी तुमचा आदर करते. पण तुम्ही एका मुस्लिम महिलेसोबत असं का वागून बसलात? एखाद मुस्लिम महिलेच्या बुरख्यासोबत केलेली छेडछाड कदापि मला सहन होणार नाही. तुम्ही आधी माफी मागावी, असं राखी सावंत म्हणाली.
ADVERTISEMENT











