पार्टीत ‘तो’ टीशर्ट घातल्याने ट्रोलिंग, अखेर रितेश देशमुखने मागितली माफी; म्हणाला...

Riteish Deshmukh apologizes : अभिनेता रितेश देशमुख याने शिवप्रेमींची माफी मागितलीये. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेऊन याबाबत भाष्य केलंय. तो काय म्हणाला? जाणून घेऊयात..

Riteish Deshmukh apologizes

Riteish Deshmukh apologizes

मुंबई तक

04 Jun 2026 (अपडेटेड: 04 Jun 2026, 03:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पार्टीत ‘तो’ टीशर्ट घातल्याने ट्रोलिंग,

point

अखेर रितेश देशमुखचं मागितली माफी; म्हणाला...

Riteish Deshmukh apologizes : अभिनेता रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या सिनेमाला महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. राजा शिवाजी हा चित्रपट मराठीतील आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. या सिनेमात रितेश देशमुख याने शिवाजी महाराजांची भूमिका निभावली. तर अभिनेता संजय दत्त याने अफजल खानाची भूमिका साकारली होती. दरम्यान, सिनेमाच्या यशानंतर 'राजा शिवाजी' सिनेमाच्या टीमने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत रितेश देशमुखने घातलेल्या एका टी-शर्टमुळे त्याला ट्रोल करण्यात येत होते. शिवाय, अनेक चाहत्यांनी याबद्दल त्याला जाब विचारला होता. याबाबत अखेर त्याने भाष्य केलंय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले, अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली

नेमकं काय घडलं? रितेशला स्पष्टीकरण का द्यावं लागलं?

'राजा शिवाजी' सिनेमाच्या यशानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत रितेशने शिवाजी महाराजांचा छायाचित्र असलेला टीशर्ट परिधान केला होता. टी-शर्टच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा छापील फोटो होता. मात्र, यावेळी या पार्टीत अनेक लोकं दारु पित होते. शिवाय, रितेश देशमुख या पार्टीत डान्स करताना पाहायला मिळत होता. हे पाहून रितेश देशमुखवर नेटकरी चांगलेच संतापले होते. शिवाजी महाराजांचा छापील फोटो असलेला टी-शर्ट घालून अशा पार्ट्यांमध्ये जाऊ नये, अशी भूमिका नेटकरी सोशल मीडियावर मांडत होते. अखेर याबाबत आता रितेश देशमुखने स्पष्टीकरण दिलंय. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेऊन याबाबत भाष्य केलंय.

हेही वाचा : बीड : सिनेमाला लाजवेल असा कट! मर्डर मिस्ट्रीचा पोलिसांकडून उलगडा

रितेश देशमुखची पोस्ट जशीच्या तशी 

नमस्कार,नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या आनंदानिमित्त आमच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी आनंदोत्सव आयोजित केला होता. त्यसंबंधाने माझा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत होता.एक शिवप्रेमी आणि प्रेक्षककुटूंब या नात्याने मी याचे स्पष्टीकरण देणे माझं कर्तव्य मानतो.

मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान करून आनंद साजरा करण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. तो टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान वापरत होतो. त्या दिवशीही मी प्रचारकार्य पूर्ण करून थेट कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने टी-शर्ट बदलणे राहून गेले.

तसेच, माझ्याबाबत समाजमाध्यमांवर होत असलेल्या काही दाव्यांविषयीही स्पष्ट करू इच्छितो की, मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणतेही आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत.

विशेष म्हणजे, हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचे निमंत्रणदेखील देण्यात आलेले नव्हते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन राजा शिवाजी या चित्रपटासाठी साडेतीन वर्षे अथक परिश्रम घेतलेल्या, कॅमेरामागील आणि कॅमेरासमोरील सर्व कलावंत व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते. तथापि, माझ्या त्या कृतीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर एक शिवप्रेमी म्हणून मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना आजही तितकीच दृढ आहे आणि कायम राहील.

जय शिवराय

आपला,
रितेश विलासराव देशमुख

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले, अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली