सौंदर्य असं की कोणीही प्रेमात पडेल, श्रिया सरनने शेअर केले स्विमिंग पूलमधील फोटो
मुंबई तक
• 12:38 PM • 27 Sep 2025
Actress Shriya Saran : अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर चर्चेत असते. आता तिने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT


1/7
अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करतानाही पाहायला मिळते.


2/7
अभिनेत्री श्रिया सरन हिने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी श्रिया सरनच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
ADVERTISEMENT


3/7
यावेळी श्रिया तिच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. तिने नवरा आणि लेकीसोबतचेही फोटो शेअर केले आहेत.


4/7
‘दृश्यम’ चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेत्री श्रिया सरन लोकप्रिय झाली होती. काही दिवसांपूर्वीच श्रिया सरन हिने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली. मिराई या थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तेजा सज्जा, जगपती बाबू यांच्यासह श्रिया देखील कपिलच्या शोमध्ये आली होती. यावेळी तिने तिच्या लग्नाबाबतची खास स्टोरी शेअर केली. नवऱ्याची पहिल्यांदा कुठे झाली होती? याबाबतचा किस्सा तिने सांगितला.
ADVERTISEMENT


5/7
श्रिया सरन म्हणाली, "मी चुकीची फ्लाइट बुक केली होती. माझा ट्रिप एप्रिलमध्ये होती, पण मी मार्चमध्येच मालदीवला गेले. तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तिथे एकटीच गेले होते. त्यावेळी मला समजलं की, दक्षिणकडे मालदीवकडे एक यॉट जाणार आहे. त्यामध्ये डायव्हिंग बोट होती, त्यामुळे मी त्याच बोटीतून गेले.


6/7
पुढे बोलताना श्रिया म्हणाली, त्याच संध्याकाळी मला कळलं की दक्षिणेकडून मालदीवकडे जाणारी एक सुंदर यॉट निघाली आहे. त्यात एक डायव्हिंग बोट होती, म्हणून मी त्या बोटीत गेले. त्या वेळी खूप सूर्यास्त होत होता, निसर्ग फार सुंदर दिसत होता. मी डेकवर उभी होते, थोडी घाबरलेली होते कारण मी एकटी होते. तिथं माझ्या कोणीही ओळखीचं नव्हतं. मी मागे वळले, तर आंद्रे माझ्या मागे उभा होता. तिथेच आमची पहिली भेट झाली."
ADVERTISEMENT


7/7
"आम्हा दोघांना एकमेकांबद्दल काहीच माहिती नव्हती आणि त्यामुळे ही भेट आणखी सुंदर व रोमांचक ठरली. आम्ही एकत्र डायव्ह केलं, गप्पा मारल्या आणि मग आम्ही डेटिंग सुरू केली. काही महिन्यांनी त्याने माझा दृश्यम चित्रपट पाहिला आणि तो खूप घाबरला. त्यानंतर आम्ही प्रेमात पडलो." असंही श्रियाने सांगितलं.
ADVERTISEMENT
