Santosh Chaudhari: बिग बॉस फेम दादूसकडून हळदीत गोळीबार?, VIDEO व्हायरल

मुंबई तक

15 May 2023 (अपडेटेड: 15 May 2023, 03:37 PM)

Dadoos: बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस याने एका हळदी कार्यक्रमात गोळीबार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेचा सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याबाबत सध्या पोलीस चौकशी करत आहेत.

bigg boss fame santosh chaudhary aka dadoos shooting at haldi program video goes viral

bigg boss fame santosh chaudhary aka dadoos shooting at haldi program video goes viral

follow google news

Dadoos: मुंबई: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आगरी-कोळी गीतकार बिग बॉस (Bigg Boss) फेम संतोष चौधरी उर्फ ​​दादूस (Santosh Chaudhary aka Dadoos) हळदी कार्यक्रमात हवेत गोळीबार करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता याचा तपास सुरू केला आहे. गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो आर एके मार्ग पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (bigg boss fame santosh chaudhary aka dadoos shooting at haldi program video goes viral)

हे वाचलं का?

मध्यरात्री, आरएके मार्ग पोलिसांचे एक पथक वराच्या घरी गेले जेथे तो हळदीचा कार्यक्रम करत होता, परंतु वर आणि त्याचे कुटुंबीय घरी नव्हते. पोलिसांनी काही कुटुंबीयांशी बोलले ज्यांनी सांगितले की ही एक खेळण्यांची बंदूक होती, ज्याचा दावा संतोष चौधरी यांनी केला होता. मात्र, घटनेदरम्यान गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी संतोष चौधरी यांच्याशीही संपर्क साधला .

या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, तसेच पोलीस कॅमेऱ्यासमोर काही बोलत नाहीत.

दादूस म्हणाला ती खरी बंदूक नाही, तर…

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आज (15 मे) पहाटे गायक संतोष चौधरीची त्याच्या भिवंडीतील राहत्या घरी चौकशी केली. संतोष चौधरी उर्फ ​​दादूस यांनी हळदी समारंभातील घटनेची पुष्टी केली. पण त्याने पोलिसांना सांगितले की ती खरी बंदूक नसून ते एक डेमो वेपन आहे. ज्याच्या फायर राउंडमधून फक्त आवाज होतो.. दुसरे काहीही नव्हते.

दादूसने पोलिसांना एक प्रतिज्ञापत्र दिले आहे. ज्या प्रतिज्ञापत्रात त्याने म्हटले आहे की, त्याच्याकडे (Atak Arm private ltd) चा ​​एक कॅल 380 ब्लँक स्टार्ट रिव्हॉल्व्हर आहे.

हे ही वाचा >> Gautami Patil : गौतमी पाटीलवर बार्शीत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

हे रिव्हॉल्व्हर तुर्कीमध्ये बनवलेले आहे आणि ते दुरुस्त केले जाऊ शकत नाही किंवा बदलू शकत नाही. प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, संतोष चौधरी या स्टार्टर पिस्तूलचा गैरवापर करणार नाही असे त्यात वचन दिले आहे. तसेच न्यायालयात त्याच्यावर कोणताही फौजदारी खटला नाही. तसेच शस्त्रास्त्रे बाळगण्यासाठी किंवा वापरण्यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेले आर एके मार्ग पोलीस रिव्हॉल्व्हर आणि त्याच्याशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे तपासत आहेत. तसेच चौधरी याने शस्त्राबाबत केलेले दावेही ते तपासत आहेत.

हे ही वाचा >> जगाचा विनाश जवळ आलाय? किलर रोबोट्स ते ब्लॅक होल… 10 गोष्टी घेणार पृथ्वीचा घास

पोलीस सूत्रांनी सांगितले की, हे एक डमी रिव्हॉल्व्हर असल्याचे सत्यापित केले गेले आहे. ज्यासाठी परवान्याची आवश्यकता नाही. काही कायदेशीर कारवाई आवश्यक असल्यास पोलिसांकडून ती केली जाईल.

    follow whatsapp