Tiger Shroff Firing : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला होता. संबंधित आरोपींनी राजस्थानच्या कोटा येथून अटक करण्यात आली आहे. कोटा येथील रेल्वे पोलीस ठाणे क्षेत्रातच राजस्थान आणि कोटा शहर पोलिसांनी आरोपींना अटक केली. टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर 15 तासांत आरोपी कोटा येथे कसे काय जातात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :
आरोपी 15 तासांच कोटा येथे कसे पोहोचलो?
अटकेत असलेले आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली. दुसऱ्या एका आरोपीची रितिक कुमार उर्फ रोशन अशी ओळख समोर आली, तो बिहारच्या बेगूसराय येथील रहिवासी आहे. तिसरा आरोपी हा सोनीपत येथील रहिवासी आहे, त्याची ओळख रेहान अशी समोर आली आहे. आरोपींना कोटा येथून अटक करण्यात आली. मुंबई ते कोटा हे 927 किमी अंतर आहे. रस्तेमार्गाने हेच अंतर पूर्ण करण्यासाठी 15 ते 22 मिनिटांचा कालावधी लागतो. पोलिसांना घटनेची माहिती मिळाली की, आरोपी हा पुणे-जयपुर सुपरफास्ट एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. यानंतर पोलिसांनी अँटी टास्क फोर्सशी समन्वय राखून आरोपींना अटक केली.
आरोपी कसे पळाले?
रविवारी सायंकाळी 7 वाजता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला होता. गुन्ह्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले, नंतर अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले होते. रात्री त्यांनी पुणे-जयपुर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि फरार होण्याच्या प्रयत्नात होते. पुणे-जयपुर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनला कोणताही स्टॉप नाहीये, ही बाब लक्षात आली होती.
हे ही वाचा : Astrology : आजचे एकूण राशींचे भविष्य, 'या' राशींना पैसे जपून वापरण्याचा सल्ला
याचा अर्थ आरोपी हे वसई लोकल स्थानकावर गेले असतील, असा संशय व्यक्त करण्यात आला. तिथूनच आरोपींनी पुणे-जयपुर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन पकडली असावी. रेल्वे क्रमांक 12939 रात्री 10.09 वाजण्याच्या सुमारास वसई स्थानकाजवळ पोहोचली होती. आरोपी याच एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करत होते. त्यांचे दिल्लीहून हरियाणाकडे जाण्याचा प्रयत्न होता. रेल्वे कोटा येथे पोहण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली. सुरुवातीला आरोपींचा प्लान दिल्लीहून हरियाणाकडे जाण्याचा होता, मात्र त्यांचा प्लान उधळला. आता पोलिसांनी त्यांची चौकशी केला, तसेच आता पोलीस या गोळीबारामागील नेमकं कारण शोधत आहेत.
ADVERTISEMENT












