Saif Ali Khan: सैफच्या हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या? मुंबई पोलिसांनी पकडला CCTV मध्ये दिसणारा चोरटा?

Saif Ali Khan Attacked Latest News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांकडून या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.

Saif Ali Khan Attack latest News Update

Saif Ali Khan Attack latest News Update

मुंबई तक

• 12:59 PM • 17 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरणात मोठी अपडेट आली समोर

point

मुंबई पोलिसांनी संशयित आरोपीला घेतलं ताब्यात

point

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवली 20 पथकं

Saif Ali Khan Attacked Latest News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांकडून या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. सीसीटीव्हीमध्ये सापडलेल्या चोरट्यासारखाच हा आरोपी दिसत असल्याने संशय बळावला आहे. ज्या संशयीत आरोपीला पकडण्यात आलं आहे, तो घरफोड्या करणारा आरोपी आहे. त्याच्यावर याआधीही घरफोड्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मुंबईच्या डीसीपींनी दिली आहे.

हे वाचलं का?

16 जानेवारीला रात्री 2 वाजताच्या सुमारास चोरट्याने घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने 6 वार केले होते. चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला होता. यावेळी चोरट्याने सैफवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर सैफला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे ही वाचा >> Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांचा खून, तिसरा भाऊ गंभीर जखमी, घडलंय तरी काय?

आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 20 पथक बनवले होते. प्रत्येक टीमला वेगवेगळा टास्क देण्यात आला होता. सैफ अली खान बिल्डिंगच्या 12 व्या मजल्यावर राहतात. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी हल्लेखोराचा तपास सुरु केला. चोरट्याने सैफवर हल्ला केल्यानंतर कपडे बदलले होते, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलीय.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या घरी 56 वर्षांची स्टाफ नर्स काम करत होती. एलियामा फिलिप असं तिचं नाव आहे. तिने या घटनेची वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरट्याने तिच्यावरही हल्ला केला. दरम्यान, पोलिसांनी नर्स फिलिप, घरात काम करणारे स्टाफ, बिल्डिंगचा गार्ड आणि अन्य लोकांची चौकशी केली आहे.

हे ही वाचा >> Saif Ali Khan Case: सैफवर हल्ला केल्यानंतर चोरट्याने कपडे बदलले अन्...; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानचा मुलगा तैमूर आणि जेहच्या रुममध्ये घडली. हल्लेखोर आतमध्ये कसा घुसला? हल्ला करणारा चोरटा बाहेरून आला होता की आधीपासून आतमध्येच होता, पोलीस याचाही शोध घेत आहेत. दरम्यान, करिना कपूरने सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना आवाहन करत म्हटलंय, "आमच्या कुटुंबासाठी खूप आव्हानात्मक दिवस राहिला. आम्ही अजूनही काही गोष्टी पडताळण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सर्व कसं घडलं, याचा विचार करत आहोत. या कठीण काळात मीडिया आणि पापाराजींना विनंती करत आहे की,कोणत्याही अफवा पसरवू नका. जे सत्य नसेल, तसं काही कव्हरेज करू नका".

    follow whatsapp