मोठी बातमी : ऑस्कर 2027 साठी भारताकडून 'या' मराठी सिनेमाची निवड!

मुंबई तक

18 Sep 2026 (अपडेटेड: 18 Sep 2026, 04:46 PM)

Gondhal Marathi Film Is India's Official Entry To Oscars 2027 : संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी सिनेमाची भारताकडून ऑस्कर 2027 साठी निवड करण्यात आलीये.

Gondhal Marathi Film Is India's Official Entry To Oscars 2027

Gondhal Marathi Film Is India's Official Entry To Oscars 2027

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ऑस्कर 2027 साठी भारताकडून 'या' मराठी सिनेमाची निवड!

point

33 चित्रपटांमधून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची निवड

Gondhal Marathi Film Is India's Official Entry To Oscars 2027 : दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या 'गोंधळ' या मराठी सिनेमाची भारताकडून ऑस्कर 2027 साठी निवड करण्यात झाली. फिल्म फेडरेशनकडून शुक्रवारी (दि.18) ही घोषणा करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यीय निवड समितीने यंदा ऑस्करसाठी शर्यतीत असलेल्या 33 चित्रपटांमधून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची निवड केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या, कुजलेली बॉडी कुत्रे खाऊ लागले, 4 आरोपी अटकेत

लोककला प्रकार चित्रपटाच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग

'गोंधळ' ही नववधूची कथा आहे. तिचा प्रियकराला एका पवित्र लोकविधीचे असलेले आकर्षण सुमन एका धोकादायक खेळात बदलते. या खेळातून फसवणूक, इच्छा आणि संघर्ष समोर येतो. महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडते. संगीत, नृत्य आणि पौराणिक कथांचा समावेश असलेला हा रात्रभर चालणारा लोककला प्रकार चित्रपटाच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. लग्न सोहळ्यापासून सुरू होणारी कथा पुढे विश्वासघात आणि गावातील दडलेल्या तणावांच्या गडद कथेत बदलते. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहनी, निशाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

हेही वाचा : बीड : लेकीच्या शिक्षणासाठी 'माऊली' अनवाणी धावली, आता भारताच्या उपराष्ट्रपतींचा मोठा निर्णय!

भारतीय संस्कृतीच्या चित्रणामुळे सिनेमा निवड समितीसमोर उठून दिसला

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अभय सिन्हा, सचिव धर्मेंद्र मेहरा, कोषाध्यक्ष संग्राम शिर्के, संरक्षक टी. पी. अग्रवाल, उपाध्यक्ष हिराचंद, निशांत उज्ज्वल आणि अध्यक्ष पी. शेषाद्री यांच्या उपस्थितीत निवडीची घोषणा झाली. हसन यांनी सांगितले की, ‘गोंधळ’ प्रत्येक बाबतीत वेगळा ठरला. भारतीय संस्कृतीचे चित्रण, फोटोग्राफी आणि संगीत यामुळे चित्रपट निवड समितीसमोर उठून दिसला. भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्याची एकमताने निवड करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इक्कीस’ आणि ‘Angh’ हे देखील समितीने निवडलेल्या अंतिम तीन चित्रपटांमध्ये होते.

‘गोंधळ’ हा संतोष डावखर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला फीचर चित्रपट आहे. गोव्यात झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. तिथे त्याला विशेष ज्युरी मान्यतेसाठी सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला. मात्र, नोव्हेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची थिएटरमधील कामगिरी मर्यादित राहिली आणि ट्रेड रिपोर्टनुसार बॉक्स ऑफिसवरील प्रतिसाद संथ होता. ऑस्करसाठी निवड होणे हा या प्रवासातील पहिला टप्पा आहे. पुढे अकादमीच्या इंटरनॅशनल फीचर फिल्म मतदान प्रक्रियेत 15 चित्रपटांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल आणि त्यानंतर अंतिम पाच नामांकित चित्रपट निवडले जातील. 99वे अकादमी पुरस्कार 14 मार्च 2027 रोजी होणार आहेत.