17 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या, कुजलेली बॉडी कुत्रे खाऊ लागले, 4 आरोपी अटकेत

मुंबई तक

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पीडितेचा कुजलेला मृतदेह मोकळ्या मैदानात आढळला. या प्रकरणात तीन अल्पवयीनांसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

17 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या

point

कुजलेली बॉडी कुत्रे खाऊ लागले, 4 आरोपी अटकेत

Crime News : नवी दिल्लीमध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची चाकूने हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. मुलीचा कुजलेला मृतदेह 13 सप्टेंबर रोजी कुशक रोडवरील मोकळ्या जागेत आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी खराब होती की, सुरुवातीला तो महिलेचा आहे की पुरुषाचा, हेही स्पष्ट होत नव्हते. मृतदेहाचे काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्ले होते. तसेच तिचा एक हात शरीरापासून वेगळा झालेला आढळला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते. ती त्यांच्यासोबत टेम्पोमध्ये गेली होती. याच टेम्पोमध्ये त्यांनी मद्यपान केल्याचा आणि त्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : 'सिलेंडर आणायचाय? चला सोडतो', शेजाऱ्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला मित्राच्या घरी नेलं अन्...

50 हून अधिक सीसीटीव्ही तपासले, टेम्पोच्या हालचालीवरून आरोपींपर्यंत पोहोचले

मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दाखल केली नव्हती. ती अनेकदा घरातून बाहेर जाऊन काही दिवसांनी परत येत असे, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. या प्रकरणात बीएनएस आणि पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी नसल्याने आणि सुरुवातीला आरोपींची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी परिसरातील तसेच लगतच्या मार्गांवरील 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासादरम्यान संबंधित वेळेत घटनास्थळाजवळून एक टेम्पो जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अंधारामुळे टेम्पोचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे विविध सीसीटीव्ही ठिकाणांवरील त्याच्या हालचालींचा माग काढण्यात आला.