'सिलेंडर आणायचाय? चला सोडतो', शेजाऱ्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला मित्राच्या घरी नेलं अन्...

मुंबई तक

Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेला दुसऱ्या व्यक्तीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'सिलेंडर आणायचाय? चला सोडतो'

point

शेजाऱ्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला मित्राच्या घरी नेलं अन्...

Crime News : शेजाऱ्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेला दुसऱ्या व्यक्तीच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. ही घटना मातौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कायदेशीर कलमांनुसार कारवाई केली आहे.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करुन हत्या, कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके

मद्यपान करुन महिलेशी गैरवर्तन, दुसऱ्याकडून अत्याचार 

तक्रारीनुसार, संबंधित महिला गॅस सिलिंडर भरण्यासाठी जात होती. त्यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने तिला मोटारसायकलवरून लिफ्ट देण्याची ऑफर दिली. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जाण्याचे मान्य केले. मात्र, संबंधित ठिकाणी नेण्याऐवजी त्याने तिला आपल्या दुसऱ्या मित्राच्या घरी नेले. तेथे दोन्ही पुरुषांनी मद्यपान केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा, तर दुसऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

हेही वाचा : मतं पक्षाला की आमदाराला? कोर्टाने निवडणूक आयोगाला या मुद्द्यात कसं पकडलं?