मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या चर्चा आहे ती एका 'रुबाबदार' लव्हस्टोरीची. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे (Shekhar Bapu Rankhambe) यांच्या आगामी 'रुबाब' (Rubaab) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मोठ्या दिमाखात प्रदर्शित झाला आहे. झी स्टुडिओज आणि झणकर फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची झलक पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'सापावर विश्वास ठेवावा पण, पोरींवर नाय...'; 'रुबाब'चा ट्रेलर पाहून नागराज मंजुळेही झाले थक्क!
'रुबाब'दार ट्रेलर आणि हटके संवाद 'तुझ्यासारखी नको... तूच पाहिजे'
'रुबाब'दार ट्रेलर आणि हटके संवाद 'तुझ्यासारखी नको... तूच पाहिजे' अशी प्रेमाची नवी व्याख्या मांडणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्रेलरमध्ये नायक संभाजी ससाणे आणि नायिका शितल पाटील यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. ट्रेलरमधील "सापावर विश्वास ठेवावा पण, पोरींवर नाय..." हा संवाद सध्या तरुणाईमध्ये विशेष गाजत आहे. हा चित्रपट केवळ एक प्रेमकहाणी नसून स्वाभिमान, अॅटिट्यूड आणि संघर्षाची गाथा असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.
नागराज मंजुळेंकडून कौतुकाची थाप
नागराज मंजुळेंकडून कौतुकाची थाप या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी खास उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी दिग्दर्शक शेखर रणखांबे आणि संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले. नागराज मंजुळे म्हणाले, "ट्रेलर पाहताच लक्षात येतं की ही गोष्ट काहीतरी वेगळी आहे. चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत भव्य असून संगीतही मनाला भिडणारे आहे. संभाजी आणि शितलची जोडी पडद्यावर खूपच प्रभावी वाटते. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल."
प्लंबिंग ते दिग्दर्शन
प्लंबिंग ते दिग्दर्शन: शेखर रणखांबे यांचा प्रेरणादायी प्रवास 'रुबाब' चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मूळचे सांगलीचे असलेल्या शेखर यांनी सुरुवातीच्या काळात पोटापाण्यासाठी प्लंबिंगची कामे केली. मात्र, जिद्द आणि कलेच्या जोरावर त्यांनी लघुपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या 'रेखा' या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता 'रुबाब' या चित्रपटाद्वारे ते व्यावसायिक दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
हे ही वाचा : मुंबईचं महापौर पद कोणासाठी राखीव? राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर
स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख या चित्रपटात संभाजी ससाणे, शितल पाटील यांच्यासह विशाल शिरटोडे, अभिजीत सकपाळ आणि सिमरन खेडकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत चिनार-महेश यांनी दिले आहे. हा चित्रपट येत्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
ADVERTISEMENT











