मुंबईचं महापौर पद कोणासाठी राखीव? राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

मुंबई तक

BMC Mayor : आज 22 जानेवारी रोजी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली 29 महापालिकांची सोडत मंत्रालयात पार पडली. अशातच चर्चेत राहिलेली महापालिका म्हणजे मुंबई महापालिका होय. याच महापालिकेच्या महापौरपदासाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

BMC Mayor
BMC Mayor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली 29 महापालिकांची सोडत जाहीर

point

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी कोणत्या वर्गाला संधी?

BMC Mayor : राज्यात महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर बरंच राजकीय नाट्य बघायला मिळालं होतं. त्यानंतर आज 22 जानेवारी रोजी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली 29 महापालिकांची सोडत मंत्रालयात जाहीर झाली. अशातच चर्चेत राहिलेली महापालिका म्हणजे मुंबई महापालिका होय. याच महापालिकेसाठी महापौरपदासाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे, याचं चित्र स्पष्ट झालं आहे. बीएमसीमध्ये महापौरपदासाठी खुल्या वर्गातील महिलांसाठी सोडत जाहीर केल्याचं चित्र आहे.  

हे ही वाचा : मुंबईचं महापौर पद कोणासाठी राखीव? राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्यातील 29 महापालिकेच्या महापौरपदासाठी सोडत जाहीर 

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका - ST (अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
ठाणे - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
जालना - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव)- महिलांसाठी
लातूर - SC (अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
पनवेल - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
अकोला - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
अहिल्यानगर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
उल्हासनगर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
कोल्हापूर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
चंद्रपूर - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
इचलकरंजी - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - सर्वसाधारण
जळगाव - OBC (इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव) - महिलांसाठी
मुंबई - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
नवी मुंबई - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
मीरा-भाईंदर - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
पुणे - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
पिंपरी-चिंचवड - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
सांगली - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
सोलापूर - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
छ. संभाजीनगर - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
नाशिक - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
नागपूर - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
नांदेड - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
वसई-विरार - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
धुळे - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
मालेगाव - Open (खुला प्रवर्ग) - महिलांसाठी
भिवंडी - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
अमरावती - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण
परभणी - Open (खुला प्रवर्ग) - सर्वसाधारण

हे वाचलं का?

    follow whatsapp