Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल केले आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती पुत्र मल्हार पाटेकर यांनी दिली. त्यानंतर देशभरातून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच आता सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख यांनी नाना पाटेकर यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट केली. ज्यात त्याने नानांना आपल्यासोबत मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'या युगाचे पहिले नायक 100 % नाना..', राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
अभिनेता रितेश देशमुखची पोस्ट
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसलाय. असे वाटले की एखाद्याने ट्रेकनेच आपल्याला धडक दिली आहे. एक सर्वोत्कृष्ट अभिनेते, ज्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यांनी आपल्या स्वत:च्या अनोख्या अशा अभिनय शैलीने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांनी कोणतीच भूमिका सोडली नाही, प्रत्येक भूमिकेत त्यांनी चोख काम केले आणि बाजी मारली, मग तो एक अफाट नायक असो, एक भयानक खलनायक असो किंवा त्यांची चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी विनोदी भूमिका असो.
हे ही वाचा : तुम्हाला माहितीये का नाना पाटेकर यांचं खरं नाव? जाणून घ्या 'नाना' या प्रसिद्ध नावामागची कहाणी!
मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा अपूर्ण
मला 'ब्लफमास्टर' आणि 'हाऊसफुल ५' मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, पण त्यांच्यासोबत मराठी चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा कायमच अपूर्ण राहील. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि लाखो हितचिंतकांना माझ्या मनःपूर्वक आणि सखोल संवेदना. खरोखरच, एका युगाचा अंत झाला आहे, असं ट्विट करत रितेश देशमुखने नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
ADVERTISEMENT












