अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, घटनेनं परिसर हादरला

मुंबई तक

18 Oct 2026 (अपडेटेड: 18 Oct 2026, 08:35 PM)

Tiger Shroff News : मुंबईच्या जुहू परिसरात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचा स्टार अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आहे. या झालेल्या गोळीबारात टायगर श्रॉफला कोणतीही इजा झाली नसल्याचे वृत्त समोर आले.

Tiger Shroff News

Tiger Shroff News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार

point

मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?  

Tiger Shroff News : मुंबईच्या जुहू परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचा स्टार अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आहे. या झालेल्या गोळीबारात टायगर श्रॉफला कोणतीही इजा झाली नसल्याचे वृत्त समोर आले. घडलेल्या घटनेनुसार अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला, मात्र यामागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'माझा नवरा नपुंसक असल्याने सासरा नको तेच..', सुनेचा धक्कादायक आरोप

मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?  

यापूर्वी बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर देखील गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच बाबा सिद्दीकी यांच्यावरही गोळीबार करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आता थेट टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे आता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

अभिनेत्यांवरील गोळीबारांच्या घटना 

एप्रिल 2024 रोजी अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर अभिनेत्याच्या निवासस्थानी गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोईने जबाबदारी घेतल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत

फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू भागातील निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर संशयितांना अटक करण्यात आली होती. 

जानेवारी 2026 रोजी ओशिवरा अंधेरी येथे देखील गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.