ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एकट्याच राहतात नीतू कपूर; कारण…

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं. तर ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर एकट्याच राहत आहेत. दरम्यान रणबीर कपूर आईसोबत राहत नसल्याने त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र आता नीतू कपूर यांनी एकटं राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. View this post on Instagram A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:43 PM • 13 May 2021

follow google news

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं. तर ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर एकट्याच राहत आहेत. दरम्यान रणबीर कपूर आईसोबत राहत नसल्याने त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र आता नीतू कपूर यांनी एकटं राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

एका बेवसाईटला दिलेल्या मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या, “माझी दोन्ही मुलं रिद्धिमा आणि रणबीर या दोघांनीही आपआपल्या आयुष्यात व्यस्त राहावं असं मला वाटतं. मेर दिल में रहो, मेरे सर पे मत चढो, असे मी त्यांना नेहमी म्हणते. लॉकडाऊनच्या काळात रिद्धिमा माझ्यासोबत राहत होती. त्यावेळी मी अस्वस्थ व्हायची. प्लीज सासरी जा असं मा तिला सतत म्हणायचे. मला तिला इथून पळवून लावायचं होते. कारण मला एकटीला राहायचं होतं. मला प्रायव्हर्सी आवडत असून असंच मला जगायला आवडतं”

माझी दोन्ही मुलं विदेशात होती. त्या काळात मी अधिक स्ट्राँग झाली. पुढे त्या एकटेपणाची मला सवय झाली. ते येतात तेव्हा मला आनंद होतो. पण त्यांनी सतत सोबत राहणे गरजेचे नाही. संपर्कात राहा, कनेक्ट राहा पण माझ्या अवतीभवती राहण्याची गरज नाही असं मी त्यांना नेहमी म्हणत असते, असंही नीतू कपूर यांनी सांगितलं.

    follow whatsapp