Nitin Desai : सिनेसृष्टीवर आघात! कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

अजय परचुरे

02 Aug 2023 (अपडेटेड: 02 Aug 2023, 09:58 AM)

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टीवर मोठा आघात झाला आहे.

nitin chandrakant desai committed suicide in ND Studio, Karjat.

nitin chandrakant desai committed suicide in ND Studio, Karjat.

follow google news

Nitin Desai news, entertainment news in Marathi : सिनेसृष्टी एका घटनेने बुधवारी हादरली. असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचं कारण समजू शकलेले नाही. (Art and production designer Nitin Chandrakant Desai committed suicide in karjat)

हे वाचलं का?

कला दिग्दर्शनाची दैवी देणगी लाभलेल्या नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी नितीन देसाई यांनी आयुष्याला पूर्णविराम दिला. नितीन देसाई यांचा कर्जत येथे एनडी स्टुडिओ आहे. याच स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेतला.

नितीन देसाईंच्या आत्महत्येबद्दल पोलिसांनी काय सांगितलं?

स्टुडिओतील कर्मचाऱ्यांना नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याची आढळून आलं. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, “आज (2 ऑगस्ट) सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना एनडी स्टुडिओमध्ये आढळून आला. आम्ही सर्व पैलू तपासून पाहत आहोत.”

वाचा >> RPF Constable : “मनोरुग्ण निवडून माणसं मारतो का?”, जितेंद्र आव्हाडांचा चढला पारा

नितीन देसाई हे कला दिग्दर्शनासाठी ओळखले जात होते. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सेट तयार केले होते. ‘लगान’, ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘माचिस’, ‘जोधा अकबर’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’, ‘द लिजेड ऑफ भगत सिंग’, ‘परिंदा’, ‘बालगंधर्व’, ‘रंगीला’ अशा असंख्य हिंदी मराठी चित्रपटाचं कला दिग्दर्शन नितीन देसाईंनी केलं होतं.

वाचा >> Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?

राजकीय नेत्यांशी होते जिव्हाळ्याचे संबंध

नितीन देसाईंनी कला दिग्दर्शनासोबतच राजकीय रॅली आणि विविध कार्यक्रमांसाठीही सेट तयार केले होते. त्यांनी तयार केलेल्या सेटची नेहमीच चर्चा व्हायची. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून इतर सर्व राजकारण्यांशी खूप चांगले संबंध होते. नितीन देसाई यांनी 1980 च्या दशकात कला दिग्दर्शनाला सुरूवात केली होती. असंख्य सिनेमांमध्ये त्यांच्या कला दिग्दर्शनाची छाप त्यांनी सोडली.

    follow whatsapp