बॉलिवूडमधील एक क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा. यांच्या जोडीला फॅन्सची देखील नेहमी पसंती मिळत असते. रितेश देशमुख सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो. जेनेलियासोबत अनेक फोटो तसंच काही फनी व्हीडियोस तो पोस्ट करत असतो. तर नुकतंच रितेशने त्याचा आणि जेनेलियाचा एक व्हीडियो शेअर केलाय.
ADVERTISEMENT
रितेशने शेअर केलेल्या या व्हीडियोमध्ये रितेश जेनेलियासमोर हात जोडताना दिसतोय. या गमतीशीर व्हीडियोला चाहत्यांकडून भरपूर लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीयोला रितेशने खास ‘yawn संबध’ असं कॅप्शन देखील दिलं आहे.
या व्हीडिओत जेनेलिया न थांबता अखंड बडबड करतेय. जेनेलियाची बडबड सुरु असताना त्याचवेळी नेमका रितेश जांभई देतो आणि जेनेलिया भडकते. “मी बोलत असतना तू जांभई काय देतोयस” असं म्हणत ती रितेशवर रागवते. मुळात रितेश जांभई देत नसून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. “मला काही बोलायचंय” असं रितेशनं तिला सांगतो. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर जेनेलियाची बडबड पुन्हा सुरु होते. शेवटी रितेश जेनेलियासमोर हात जोडावे लागतात.
अभिनेता रितेश देशमुखने हिंदी सिनेमांसोबत मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. लय भारी तसचं माऊली या सिनेमांमध्ये रितेश मुख्य भूमिकेत झळकला होता.
ADVERTISEMENT
