Saif Ali Khan Case: चोर बिल्डिंगमध्ये कसा घुसला? कुठे लपला? सैफवर हल्ला का केला? 'त्या' रात्रीचं सर्व सत्य आलं समोर

Saif Ali Khan Attacker Arrested: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला ठाणे येथील जंगलातून बेड्या ठोकल्या.

Saif Ali Khan Attacker Arrested

Saif Ali Khan Attacker Arrested

मुंबई तक

19 Jan 2025 (अपडेटेड: 19 Jan 2025, 01:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सैफ अली खानचा हल्लेखोर अटकेत

point

पोलिसांनी हल्लेखोराला कसं पकडलं?

point

सैफच्या हल्लेखोराचं सर्व सत्य आलं समोर

Saif Ali Khan Attacker Arrested: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला ठाणे येथील जंगलातून बेड्या ठोकल्या. आरोपी बांगलादेशी असून एका हाऊसकीपिंग फर्ममध्ये काम करत होता, अशी माहिती समोर आलीय. दरम्यान,  आरोपी मोहम्मद सैफच्या घरी कसा घुसला? त्याने सैफवर हल्ला का केला? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

हे वाचलं का?

सैफच्या घरी याआधीही गेला होता आरोपी?

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरी घुसून हल्ला करणारा आरोपी मोहम्मह शरीफूल इस्लाम शहजाद एका हाऊसकीपिंग फर्ममध्ये काम करत होता. सैफ त्याचा हाऊसहेल्पर हरीच्या मदतीने हाऊसकीपिंग फर्मच्या माध्यमातून सफाई करणाऱ्यांना बोलवायचा. आरोपी सैफच्या घरी याआधीही आला होता. 

हे ही वाचा >> Beed Guardian Minister: धनजंय मुंडे म्हणतात, 'मीच सांगितलेलं मला कोणतंही पालकमंत्री नको...'

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईत 5-6 महिन्यांपूर्वी आला होता. तो हाऊसकीपिंग कंपनीत काम करत होता. आरोपी पहिल्यांदाच सैफच्या घरी घुसला, असं पोलिसांना वाटतंय. तो चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसला असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हल्लेखोर सैफ-करिनाच्या घरात कसा घुसला?

16 जानेवारीच्या रात्री आरोपी मोहम्मह शरीफूल इस्लाम शहजादने पाहिलं की बिल्डिंगचा सुरक्षा रक्षक झोपला आहे, तेव्हा तो बिल्डिंगच्या 11 व्या मजल्यावर पोहोचला. तो आरोपी डक्ट शाफ्टमध्ये घुसला. त्यानंतर तो सैफच्या घरी डक्टच्या माध्यमातून पोहोचला. घरात घुसल्यानंतर तो बाथरुममध्ये लपला होता.

हे ही वाचा >> CM फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना मोठा हादरा, पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण...

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

रिपोर्टनुसार, हल्लेखोर मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद आधी वरळीत राहत होता. घटनेच्या दिवशी तो ट्रेनने ठाण्याला गेला. ठाण्यात एक दुचाकीस्वार त्याला घेण्यासाठी आला होता. या बाईकच्या नंबरने पोलिसांनी आरोपीला ट्रॅक केलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ठाणे येथील हिरानंदानी इस्टेटजवळ असलेल्या लेबर कॅम्पच्या झाडीत पकडलं. 


 

    follow whatsapp