नुकतंच अभिनेत्री परिणीची चोप्रा हिचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. तर आता परिणीतीचा बहुप्रतिक्षित आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून येत्या 26 मार्च रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये पहायला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री परिणीती चोप्राने या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना ‘सायना….26 मार्च रोजी थिएटरमध्ये’ असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टरमध्ये एक हात दिसत असून आणि त्याच्यार शटलकॉकच्या आकारात सायना असं लिहिण्यात आलं आहे. शिवाय पोस्टरमध्ये असलेल्या हातावर तिरंग्याचा बँड आहे. त्याचसोबत पोस्टरवर मार दूंगी असंही लिहिण्यात आलंय. तर या सिनेमाचा एक छोटा टिझर सायना नेहवालने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रिलीज केलाय.
अखेर आज या सिनेमासाठी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे. परिणीतीने सायना नेहवालच्या बायोपिकसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तर या सिनेमात पुलेला गोपिचंद यांच्या भूमिकेत मानव कौल दिसून येणार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेते परेश रावलही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणात आहेत. पहिल्यांदा सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही कारणाने श्रद्धाने सिनेमा सोडला. त्यानंतर परिणीतीने हा सिनेमा साइन केला.
नुकतंच 26 फेब्रुवारीला ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा हॉलिवूडच्या सिनेमाचा रिमेक आहे. याचसोबत 19 मार्च रोजी परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांचा संदीप और पिंकी फरार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.
ADVERTISEMENT
