उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली.. जाहिरातीमधील अलार्म काकांचं निधन

प्रत्येकवर्षी दिवाळी आली की एक जाहिरात टीव्हीवर आपल्याला नेहमी पाहायला मिळते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ कलाकार ‘विद्याधर करमरकर ‘ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले आहे.विद्याधर करमरकर हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक जाहिराती साकारल्या आहेत. विद्याधर करमरकर याना सगळेजण आबा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:54 AM • 21 Sep 2021

follow google news

प्रत्येकवर्षी दिवाळी आली की एक जाहिरात टीव्हीवर आपल्याला नेहमी पाहायला मिळते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ कलाकार ‘विद्याधर करमरकर ‘ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले आहे.विद्याधर करमरकर हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक जाहिराती साकारल्या आहेत. विद्याधर करमरकर याना सगळेजण आबा म्हणूनच ओळखायचे.

हे वाचलं का?

मुंबईत विलेपार्ले येथे ते वास्तव्यास होते. सुरुवातीच्या काळात नोकरी करून त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली होती. वर्षीकोत्सव कार्यक्रमात ते नेहमी हिरीरीने सहभागी व्हायचे. त्यात अनेक नाटकांचे सादरीकरण त्यांनी केले होते तर कधी दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जीया , सास बहु और सेन्सेक्स, लंच बॉक्स ,एक थी डायन, एक व्हिलन यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी कधी वडील तर कधी आजोबांच्या भूमिका साकारल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात देखील त्यांचा वावर पाहायला मिळाला. मोती साबण, इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट अशा नामवंत जाहिरातीतूनही त्यांनी काम केलं आहे. नव्वदीच्या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह भल्याभल्याना लाजवेल असाच होता. एकदा चित्रपटाच्या शुटिंगवेळी ते आजारी पडले होते त्या अवस्थेतही विद्याधर यांनी अगोदर आपले चित्रीकरण पूर्ण करण्यावर अधिक भर दिला होता. सोमवारी २० सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

    follow whatsapp