Maharashtra Weather : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी राज्यात सामान्यतः उबदार आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर हवामान अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत तापमान जास्त असून, थंडीची लाट ओसरलेली आहे. राज्यातील एकूण हवामानाच्या अंदाजाबाबतची माहिती जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीवर दिवसाढवळ्या गोळीबार, शहरात खळबळ
कोकण :
कोकण विभागात हवामान सुखद राहण्याची शक्यता आहे. या विभागात किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअसच्या आसपास हवामान राहिल असा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. या विभागात किमान तापमान हे 10 ते 15 अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी तापामान हे 10 अंशांखालीही नोंदवले जाईल. त्याचप्रमाणे कमाल तापमान हे 28 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच धुक्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रात जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहील. सकाळी धुक्याची शक्यता आहे. तसेच नाशिकसह जळगाव आणि उर्वरित भागांमध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी, असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
मराठवाडा :
हे ही वाचा : पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या इच्छूक उमेदवाराने एबी फॉर्म गिळला, कार्यकर्त्यांनी काढली समज तरीही...
मराठवाडा विभागात हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच थंडीचा जोर हा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच थंडीचा जोर कायम असला तरीही 1 जानेवारीनंतर तापमानात किंचित वाढ होऊ शकते.
ADVERTISEMENT











