Rajeshwari Kharat Facebook Post : ख्रिसमस, म्हणजेच नाताळ हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः ख्रिश्चन धर्मीयांसाठी हा सर्वात महत्वाचा सण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून 25 डिसेंबरला हा सण साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्मिय चर्चमध्ये जात प्रार्थना करतात. मिठाई वाटून भेटवस्तू देऊन तसेच नवीन कपडे घालून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच प्रमाणे अभिनेत्री राजेश्वरी खरात ख्रिसमस साजरा करण्यासाठी चर्चमध्ये गेली होती. मात्र, तिने चर्चमधील फोटो शेअर केल्यानंतर तिचं नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग करण्यात आलं. त्यानंतर राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलर्संना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
नमस्कार, काल क्रिसमस निमित्ताने चर्च ला गेले असता काहींच्या पोटात फार दुखले आणि मला ते पाहून वाईट वाटले. मंदिरात गेल्यावरही तेच, तू धर्म बदलला आहेस इथे का आलीस, आणि चर्च ला गेल्यावर अरे तू शेवटी धर्म बदलला. ( जो मी नाही बदलला ) मला संविधानाने हक्क दिला आहे मी पाहिजे त्या धर्माला मानेल किंवा काहीच मानणार नाही. कायदेशीर यात कोणी मला काहीच बोलू शकत नाही.
पहिले मला फारशी समज नव्हती धर्म जात पात याबद्दल, खरंतर तेच दिवस बरे होते. आता समजतं चाललंय किती राग आणि द्वेष भरलेला आहे लोकांमध्ये. खरे पाहता यात कोणाची चूक नाही. आपन दिसेल त्या गोष्टीवर फार लवकर प्रभावित होतो. कोणीतरी माईक घेऊन म्हणाले आपल्याला धोका आहे आणि आपन झालो भांडायला तैयार.
धर्म तुम्हाला वाचवेल, तुम्ही शक्तिमान नका बनू उगाच. आपले धर्म नाही तर आपले भविष्य धोक्यात आहे. रस्ते नाही, पाणी नाही, वृक्षतोड, प्रदूषण वाढत आहे, खून बलात्कार भ्रष्टाचार वाढताहेत. हिम्मत असेल तर या एकत्र आणि बोला यावर. कोणी बोलणार नाही.
स्वतःवर येईल तेव्हा पण तुमच्यासाठी कोणी बोलणार नाही लक्षात घ्या. सर्वांशी चांगले वागा, एकत्र मिळून सर्व सण साजरे करा एकमेकांना मदत करा आणि पहा काय धोका निर्माण होतो का. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही, आणि या गोष्टींचा मला फारसा फरकही पडत नाही, माझ सर्व छान सुरु आहे पण तुम्ही मला जे प्रेम देता त्यामुळे थोड व्यक्त होऊ वाटले. धन्यवाद.
इतर महत्त्वाच्या बातम्या
क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेवर जीव जडला अन् विवाहित असून लग्नाची मागणी, पण शेवटी नको ते घडलं अन्...
ADVERTISEMENT











