नागपूर: ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं, वादाचं हाणामारीत रूपांतर अन् 28 वर्षीय प्रणयची हत्या...

नागपुरात ख्रिसमस पार्टीनंतर, दोन गटांमधील झालेला वाद हा थेट हाणीमारीपर्यंत पोहोचला आणि याच दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं...

ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं...

मुंबई तक

• 12:14 PM • 26 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं

point

वादाचं हाणामारीत रूपांतर अन् 28 वर्षीय प्रणयची हत्या...

point

नागपुरातील धक्कादायक घटना

Crime News: नागपुरात ख्रिसमसच्या रात्रीच भयंकर घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील हॉटेल प्राइड चौकातील डाबो क्लबजवळ एका 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचं वृत्त आहे. दोन गटांमधील झालेला वाद हा थेट हाणीमारीपर्यंत पोहोचला आणि याच दरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना शुक्रवारी (26 डिसेंबर) पहाटे चार वाजताच्या सुमारास नागपुरातील सोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडली. 

हे वाचलं का?

पार्टी संपल्यानंतर, दोन्ही गटांत वाद अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील मृत तरुणाचं नाव प्रणव नरेश नन्नावरे असून या घटनेत ब्रिजलाल कारडा नावाचा 34 वर्षीय तरुण सुद्धा गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुणावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने शहरातील क्लब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. याच वेळी, वर्धा रोडवरील एका नामांकित क्लबमध्ये काही तरुणांनी पार्टी आयोजित केली होती. मात्र, पार्टी संपल्यानंतर प्राईड स्क्वेअर हॉटेलजवळ उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाजवळ दोन गटांमध्ये वाद झाला आणि काही क्षणांतच हा वाद मारहाणीत बदलला.

हे ही वाचा: तरुणाचे आपल्याच चुलत बहिणीशी प्रेमसंबंध; वडिलांना भनक लागताच मांत्रिकाला 20 लाख रुपयांची सुपारी दिली, पण...

लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या 

हा वाद सुरू असतानाच मेहुल रहाटे नावाच्या तरुणाने प्रणव नन्नावरे आणि गौरव कारडा यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात, दोन्ही पीडित तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी पीडित प्रणयला मृत घोषित केलं आणि गौरव कारडा याची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 

हे ही वाचा: ठाण्यातील सरकारी शाळेत 10 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य! फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह...

लगेच सोनगाव पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेत, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. या गंभीर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp