ठाण्यातील सरकारी शाळेत 10 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य! फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह...

मुंबई तक

ठाण्यातील मुरबाडमध्ये एका सरकारी निवासी शाळेत 10 वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. हॉस्टेलच्या खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत संबंधित पीडितेचा मृतदेह आढळला.

ADVERTISEMENT

फासावर लटकलेल्या अवस्थेत विद्यार्थीनीचा मृतदेह...
फासावर लटकलेल्या अवस्थेत विद्यार्थीनीचा मृतदेह... (AI फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यातील सरकारी शाळेत 10 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

point

फासावर लटकलेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह...

Thane Crime: ठाण्यातील मुरबाड येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील एका सरकारी निवासी शाळेत 10 वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. हॉस्टेलच्या खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत संबंधित पीडितेचा मृतदेह आढळला. मृत तरुणी ही आदिवासी प्रवर्गातील असून सरकारी योजनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या निवासी शाळेत ती शिक्षण घेत होती. 

शाळेच्या प्रशासनाने पोलिसांना दिली माहिती... 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचे नेहमीचे उपक्रम सुरू झाल्यानंतर, इतर विद्यार्थी आणि शाळेतील स्टाफला या धक्कादायक घटनेबाबत कळालं. ही घटना उघडकीस आल्यानंतर, शाळेच्या प्रशासनाने तात्काळ मुरबाड पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात, पीडितेने आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं असून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू नोंदवून तपास सुरू केला आहे. 

हे ही वाचा: मुंबई महापालिका : मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंना साथ देणार की काँग्रेसला? सर्वात मोठा सर्व्हे समोर

शाळेतील कठोर शिस्तीची तक्रार 

या घटनेनंतर, शाळा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी नुकतीच शाळेतील कठोर शिस्तीची तक्रार केली होती. या प्रकरणासंदर्भात, मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: BMC Election 2026: खळबळ उडवून देणारा सर्व्हे... 'ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावं', एवढ्या टक्के लोकांनी दिला भलताच कौल!

आदिवासी विकास मंत्र्यांनी काय सांगितलं? 

या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांनी चौकशी सुरू केली असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि तपासानंतरच आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी या शाळेची पाहणी केली होती. त्यावेळी, शाळेत मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचा दावा करून त्यांनी नाराजी व्यक्ती केली होती. शाळेच्या वसतिगृहात पुरेशा सुविधा आणि मुलांसाठी अनुकूल वातावरणाचा अभाव असल्याचं सांगण्यात आलं होतं. या घटनेमुळे स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp