Mumbai Mahapalika election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील फूट, ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष आणि मराठी मतदारांची मानसिकता यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर असेंडिया या नामांकित सर्वेक्षण संस्थेने मुंबईत केलेल्या सर्वात मोठ्या सर्व्हेचे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्व्हेतून “खरी शिवसेना कुणाची?” या प्रश्नावर मुंबईकरांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली आहेत.
ADVERTISEMENT
या सर्व्हेनुसार मुंबईतील मोठा वर्ग आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनाच ‘खरी शिवसेना’ मानत असल्याचे चित्र आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या नागरिकांपैकी तब्बल 45 टक्के मतदारांनी ठाकरे गटालाच खरी शिवसेना असल्याचे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 22 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला, तर मनसेला केवळ 1 टक्का मतदारांनी शिवसेनेचा वारसा मानला आहे.
मराठी मतदारांचा कल कुठे?
या सर्व्हेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी मतदारांची भूमिका. मुंबईतील मराठी मतदार आजही शिवसेनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. मराठी मतदारांमध्ये विचारले असता, 52 टक्के मतदारांनी तिन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावरून शिवसेनेची फूट मराठी मतदारांना मान्य नसल्याचे संकेत मिळतात. त्याचवेळी मराठी मतदारांपैकी 45 टक्के लोकांनी ठाकरे गटालाच खरी शिवसेना मानले, तर 22 टक्के मतदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. मात्र, 24 टक्के मतदारांनी यावर ठाम भूमिका मांडता येत नसल्याचे सांगितले, यावरून अजूनही संभ्रम कायम असल्याचे दिसते.
हेही वाचा : मुंबई महापालिका : मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंना साथ देणार की काँग्रेसला? सर्वात मोठा सर्व्हे समोर
काँग्रेस–सेना UBT–मनसे युतीवर काय मत?
मुंबईच्या राजकारणात युतीचे गणितही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसने शिवसेना (UBT) आणि मनसेसोबत एकत्र येऊन निवडणूक लढवावी का, या प्रश्नावर मतदारांची भूमिका फारशी ठाम नाही. सर्व्हेनुसार, 32 टक्के लोकांनी अशा युतीला पाठिंबा दिला, तर 15 टक्के मतदारांनी स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, 53 टक्के मतदारांनी “सांगता येत नाही” असे उत्तर दिले, यावरून युतीबाबत मतदार अजूनही प्रतीक्षेत असल्याचे दिसते.
मुंबई महापालिकेची सत्ता का इतकी निर्णायक?
बृहन्मुंबई महापालिका ही केवळ देशातील नव्हे, तर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिकेचे वार्षिक बजेट इतके मोठे आहे की अरुणाचल प्रदेश, गोवा आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांचे एकत्रित बजेटही त्याच्या जवळपास पोहोचत नाही. एवढेच नाही, तर भूतान, फिजी, मालदिव आणि बार्बाडोससारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट अधिक असल्याचेही सांगितले जाते. मुळेच महापालिकेची सत्ता ज्या पक्षाच्या हाती जाते, त्याच पक्षाच्या हाती मुंबईचे आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय सूत्रे एकवटतात. त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई ठरणार आहे. सेंडिया सर्व्हेचे हे निष्कर्ष पाहता, मुंबईत आजही ‘खरी शिवसेना’ हा प्रश्न मतदारांच्या मनात केंद्रस्थानी असून, त्यावरच आगामी राजकीय समीकरणे ठरण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महिला शिवसैनिक नगरसेवक झाल्याच्या आनंदात, पण 5 दिवसांनी घात झाला, अज्ञातांनी केली पतीची हत्या
ADVERTISEMENT











