Budget 2024 : पहिलं बजेट मांडणारा होता ब्रिटीश नागरीक…, काय आहे भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास?

प्रशांत गोमाणे

• 04:59 AM • 01 Feb 2024

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा अंतिम अर्थसंकल्प असणार आहे.पण तुम्हाला भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास माहिती आहे. त्याची सुरूवात कशी झाली? आणि तो कसा सादर केला जायचा? हे जाणून घेऊयात.

budget 2024 niramla sitharaman speech pm narendra modi what is the history of indian budget

budget 2024 niramla sitharaman speech pm narendra modi what is the history of indian budget

follow google news

Parliament Budget 2024, Nirmala Sitharaman : देशात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बजेट सादर करण्यात येतो. या बजेटच्या माध्यमातून शेतकरी, नोकरवर्ग, सर्वसामान्य आणि व्यावसायिकांना अपेक्षा असतात. त्यामुळे या सर्व वर्गाचे याकडे लक्ष असते. तुम्हाला भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास माहिती आहे. त्याची सुरूवात कशी झाली? आणि तो कसा सादर केला जायचा? हे जाणून घेऊयात.  (budget 2024 niramla sitharaman speech pm narendra modi what is the history of indian budget)

हे वाचलं का?

भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला होता. त्यावेळेस भारत इंग्रजांच्या राजवटीखाली होता. 19व्या शतकाच्या सहाव्या दशकात, म्हणजे 7 एप्रिल 1860 रोजी, स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राजकारणी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीच्या वतीने भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.

हे ही वाचा : Prashant Kishor : भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी

या अर्थसंकल्पात उत्पन्नाच्या स्त्रोताच्या चार घटकांचा लेखाजोखा मांडला गेला होता. यामध्ये त्यांनी मालमत्ता, व्यवसाय किंवा व्यवसायातील महसूल, रोखे, पगार आणि पेन्शनचे उत्पन्न समाविष्ट केले होते. त्यावेळी कराचे दोनच स्लॅब होते.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

दरम्यान 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आझाद झाला. आणि 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. 26 नोव्हेंबर 1947 रोजी कार्यकारी सरकारमधील अर्थमंत्री षण्मुखम शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या पहिल्या अर्थसंकल्पात खर्चाचा अंदाज 197.29 कोटी रुपये होता, तर उत्पन्न 171.15 कोटी रुपये अपेक्षित होते. वित्तीय तूट 26.24 कोटी रुपये होती.

ब्रिटिश काळात केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जायचा. यामागचे कारण म्हणजे इंग्लंडमध्ये त्यावेळेस दिवसाचे साडे अकरा वाजायचे. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा 1999 पर्यंत कायम होती.

हे ही वाचा : CM एकनाथ शिंदेंची किती आहे जमीन?, पाहा सात-बारावर कोणाकोणाची आहेत नावं..

1999 नंतर तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी त्याची वेळ बदलून सकाळी 11 वाजता केली होती. त्याच वेळी, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या औपनिवेशिक परंपरेच्या विरोधात, अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी 2017 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.

मोदी सरकारने ‘ही’ प्रथा केली बंद

दरम्यान मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 92 वर्षे जुनी प्रथा संपवत 2017 पासूनच रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात जाहीर करण्यास सुरुवात केली. यापूर्वी रेल्वेमंत्री सामान्य अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करायचे. भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प 1924 मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता.

पेपरलेस बजेटला सुरूवात

कोरोना काळात पेपरलेस बजेटला सुरूवात झाली होती. त्यामुळे 2021- 2022 चा बजेट पहिल्यांदा पेपरलेस सादर करण्यात आला होता.

सर्वांधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला?

देशात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी आठ वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत. मोरारजी देसाई यांनी त्यांच्या वाढदिवशी (29 फेब्रुवारी) दोनदा अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्यानंतर पी चिदंबरम, प्रणव मुखर्जी, यशवंत सिन्हा, मनमोहन सिंग यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

    follow whatsapp