Mumbai Crime : नौदलाचा गणवेश परिधान करून तरुण आला, नंतर जिवंत 40 काडतुसे आणि इन्सास रायफल चोरल्या

mumbai crime : कुलाब्यातील नेव्ही नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सेंट्री ड्युटीवर असलेल्या जवानाकडून एका अज्ञात व्यक्तीने एक इन्सास रायफल आणि 40 जिवंत काडतुसे असलेली दोन मॅगझिन्स चोरी केल्या.

Mumbai Crime

Mumbai Crime

मुंबई तक

• 03:20 PM • 09 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कुलाब्यातील नेव्ही नगरमध्ये धक्कादायक प्रकार

point

बनावट नौदल अधिकारी बनून मॅगझिन्सची चोरी

point

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

Mumbai Crime : कुलाब्यातील नेव्ही नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सेंट्री ड्युटीवर असलेल्या जवानाकडून एका अज्ञात व्यक्तीने एक इन्सास रायफल आणि 40 जिवंत काडतुसे असलेली दोन मॅगझिन्स चोरी केल्या. रायफल आणि गोळ्या चोरणारी व्यक्ती ही नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवले आणि जवानाला तुरी दिली.

हे ही वाचा : ठाण्यात एकाच कुटुंबातील सदस्यांनी चिकनसह, अंडी आणि वडापाव खाल्ले, पाचही जणांच्या प्रकृतीत बिघाड, नंतर तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

नेमकं काय घडलं? 

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार कफ परेड पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा एनआयए आणि एटीएसने सुरू केला आहे. भारतीय नौदलाने आपल्या निवेदनात म्हटलं की, चोरीला गेलेली रायफल लवकरात लवकर शोधून काढण्यात येईल. सध्या रायफलची शोधमोहीम सुरू आहे. यासाठी एक मंडळही स्थापन करण्यात आले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता नौदलाचा गणवेश परिधान केलेला एक अज्ञात व्यक्ती नौदलाच्या गार्डकडे आला. गार्डलाही हा आपलाच नौदलातील अधिकारी असल्याचा गैरसमज झाला. त्याने सेंट्रीला सांगितलं की, तो त्याच्या शिफ्टसाठी आला आहे आणि पुढील जागा ही त्याचीच आहे. त्याने त्याची सर्व्हिस रायफल आणि मासिके त्याच्याकडे सोपवली आणि तो त्याच्या हॉस्टेलला निघून गेला. एका तासानंतर, नुकतीच त्याची शिफ्ट संपवलेल्या गार्डला अचानकपणे आठवलं की, तो वॉच त्याचं घड्याळ विसरून आला होता. तेव्हा गार्डच्या लक्षात आलं की, तो अधिकारी त्याचं घड्याळ विसरून आला होता. त्यानंतर त्याने शोधाशोध केली असता, त्यानंतर त्याने ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवली.

हे ही वाचा : पुण्यात चाललंय तरी काय? तरुणाने 80 वर्षीय आईवर दारूच्या नशेत 'त्या' एका कारणावरून केले वार, धक्कादायक प्रकरण समोर

एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याला ड्युटीबाबत माहिती होती. त्याचा फायदा घेत त्याने चोरी केली. 

    follow whatsapp