ADVERTISEMENT
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) 10 सप्टेंबर 2025 रोजी राज्यात बहुतांश भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता 'खूप संभाव्य' असल्याचे सांगितले आहे. यासोबतच काही भागांत वीज कडकडाट, मेघगर्जना आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
हे ही वाचा : बीड हादरलं! आठवडाभरात दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत...
कोकण विभाग :
हवामान विभागाने 10 सप्टेंबर रोजी कोकण भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. कोकणातील तापमान हे 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. तसेच 9 सप्टेंबर रोजी कोकणातील काही भागांमध्ये तापमानात वाढ झाली होती.
मध्य महाराष्ट्रातील :
सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, वीज आणि हलके वारे (२०-३० किमी/तास) शक्य. पुणे, सातारा येथे ढगाळ वातावरण. मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, ज्यामुळे लँडस्लाईडचा धोका निर्माण होण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्र :
हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाची शक्यता जारी केली आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तापमान हे सामान्य असून आद्रता 65 % पर्यंत राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : Mumbai Crime : विवाहानंतर नवरा पत्नीला लॉजवर न्यायचा, नंतर तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अन् सोनं नाणं सर्वच...
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अमरावतीत हवामान विभागाने तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच वातावरण हे ढगाळलेले असेल अशी शक्यता आहे, पूर्व विदर्भात हलका पाऊस, पण एकूणच कोरडे वातावरण राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
