How To Make Detergent Powder At Home: मळलेल्या कपड्यांना स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक डिटर्जंट पावडरचा वापर करतो. परंतु, बाजारात अशाप्रकारच्या पावडर खूप महाग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने डिटर्जंट पावडर बनवू शकता. या पावडरचा वापर करून मळलेले कपडे काही मिनिटांतच स्वच्छ आणि साफ होतील. आम्ही तुम्हाला डिटर्जंट पावडर कशी बनवायची, याबाबत सोपे ट्रिक्स सांगणार आहोत. डिटर्जंट पावडर बनवण्यासाठी तुम्हाला खूप गोष्टींची आणि मेहनतीची आवश्यकता लागणार नाही. तुम्ही फक्त 6 गोष्टींच्या मदतीने दोन स्टेप्सने डिटर्जंट पावडर बनवू शकता. कसं ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
डिटर्जंट पावडर बनवण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता
- डिटर्जंट पावडर बनवण्यासाठी तुमच्याकडे 1/2 कप एप्सम सॉल्ट असला पाहिजे.
- दीड कप सोडियम
- बायकार्बोनेट (बेकिंग सोडा)
- दीड कप बायकार्बोनेट (बेकिंग सोडा)
- दीड कप कार्बोनेट (वॉशिंग सोडा)
- 1/4 कप समुद्री मीठ
- 20-25 थेंब एसेंशियल ऑईलची आवश्यकता
- एसेंशियल ऑईल तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही निवडू शकता. यामुळे डिटर्जंटमध्ये सुगंध निर्माण होईल.
हे ही वाचा >> अचानक सगळ्यांना पडतंय टक्कल... गावकरी हादरले, बुलढाण्यात 'या' Virus ची भीती!
घरी कशी बनवाल डिटर्जंट पावडर?
यासाठी सर्वात आधी एप्सम सॉल्ट, सोडियम, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा आणि समुद्री मीठ एकत्रित मिक्स करा.
तयार झालेल्या पावडरमध्ये एसेंशियल ऑईलचे 20-25 थेंब टाका आणि पावडरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करा.
एवढ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर डिटर्जंट पावडर तयार होईल.
हे ही वाचा >> Optical Illusion: स्पायडरमॅनच्या खऱ्या गँगमध्ये लपलाय एक खोटा 'SPIDERMAN'; पण कुठे? एका क्लिकवर पाहा
तुम्ही या पावडरला एखाद्या ग्लासमध्ये किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये स्टोअर करू शकता आणि गरजेपेक्षा जास्त याचा वापर करू शकता. चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही उकळल्या पाण्यात या पावडरला मिसळा. त्यानंतर यामध्ये मळलेले कपडे टाकून ते काही वेळ त्यात ठेवा. यामुळे तुमचे कपडे खूप कमी वेळात स्वच्छ आणि साफ होतील.
ADVERTISEMENT











