Kolhapur Lok sabha 2024: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

25 Dec 2023 (अपडेटेड: 09 May 2024, 06:29 PM)

Kolhapur Lok sabha 2024: कोल्हापूर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Lok sabha Election 2024 Kolhapur: कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Kolhapur Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (kolhapur lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

 

LIVE UPDATE: 

  • कोल्हापूर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 71.59% मतदान झालं आहे.
  • कोल्हापूर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 63.71% मतदान झालं आहे.
  • कोल्हापूर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 51.51% मतदान झालं आहे.
  • कोल्हापूर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 38.42% मतदान झालं आहे.
  • कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 23.77% मतदान झालं आहे.
  • कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 8.04 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार

  1. शिवसेना (शिंदे ) - संजय मंडलिक

  2. काँग्रेस - शाहू महाराज छत्रपती 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: संजय मंडलिक (विजयी उमेदवार- शिवसेना) 56.29% मतं

  2. वर्ष- 2014: धनंजय महाडिक (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 48.22% मतं

  3. वर्ष- 2009: सदाशिवराव मंडलिक (विजयी उमेदवार- अपक्ष) 41.65% मतं

  4. वर्ष- 2004:  सदाशिवराव मंडलिक (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 49.42% मतं

  5. वर्ष- 1999:  सदाशिवराव मंडलिक  (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 46.33% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

Kolhapur Lok Sabha: 'PM Modi यांचं काम पण शाहू छत्रपती पाहिजेत 'कोल्हापूरकर का संभ्रमात? |shivsena

 

    follow whatsapp