Election 2024: 'या' मतदारसंघात अजित पवार-शिंदे गटाचे उमेदवार आमनेसामने, मोठं कारण आलं समोर

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी 20 नोव्हेंबरला सुरु होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

Maharashtra Vidhansabha Election 2024

Maharashtra Assembly Election 2024

मुंबई तक

04 Nov 2024 (अपडेटेड: 04 Nov 2024, 07:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदे सेनेनं ऐनवेळी अजित पवार यांच्या उमेदवाराविरोधात फुंकलं रणशिंग

point

त्या मतदारसंघात नेमकं घडलंय तरी काय?

point

"उमेदवारांच्या सहीचं पत्र हवं..."

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी 20 नोव्हेंबरला सुरु होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अशातच देवळाली मतदारसंघात अजित पवार आणि शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. अजित पवार गटावर दबाव आणण्यासाठी राजश्री अहिरराव यांनी ऐनवेळी एबी फॉर्म दिल्यानं शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

नाशिकच्या पंधरा विधानसभा मतदारसंघात कोण कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, हे चित्र स्पष्ट झालं आहे. शिंदे सेनेनं ऐनवेळी अजित पवार यांच्या उमेदवारांविरोधात दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात एबी फॉर्म दिले होते. त्यामुळे मोठा राजकीय ट्वीस्ट निर्माण झाला आहे. कारण दिंडोरी येथून धनराज महाले यांनी माघार घेतली आहे. परंतु, देवळालीच्या राजेश्री अहिरराव यांनी माघार घेतली नाही. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं.

हे ही वाचा >> Maharashtra Election: माजी आमदार दिलीप मानेंसह मुलगा पृथ्वीराजची निवडणुकीतून माघार, नेमकं कारण काय?

आम्ही काही कारणास्तव उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते ते रद्द करा आणि त्यांची उमेदवारी ग्राह्य धरू नका. असं पत्र त्यांनी देवळालीच्या निवडणूक अधिकाऱ्यांना  दिला होता. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, उमेदवारांच्या सहीचं पत्र हवं, तरच हे ग्राह्य धरलं जाईल. देवळाली मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार असणार आहेत. अजित पवार गटाच्या सरोज आहिरे घडाळ चिन्हावर निवडणूक लढतील. राजश्री आहिरराव शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढतील. योगेश घोलप महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. ते मशाल चिन्हावर लढणार आहेत. 

    follow whatsapp