BJP : "हग्रलेख आजच लिहून ठेवा", आशिष शेलार संजय राऊतांवर का संतापले?

मुंबई तक

26 Feb 2024 (अपडेटेड: 26 Feb 2024, 11:30 AM)

Ashish Shelar Sanjay Raut latest Update : सामनातील अग्रलेखाला आशिष शेलाराचं प्रत्युत्तर. राऊतांना काय काय म्हणाले?

आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना तिखट शब्दात सुनावले आहे.

Ashish Shelar tweeted about sanjay raut and shiv sena ubt

follow google news

Ashish Shelar Sanjay Raut : 'फडणवीस, बावनकुळ्यांचा भाजप महाराष्ट्रात राहील काय?', असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली. या टीकेचा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी समाचार घेतला. (Ashish Shelar slams Sanjay Raut after he criticised chandrashekhar bawankule)

हे वाचलं का?

शेलार राऊतांना काय म्हणाले?

शेलार यांनी ट्विट करत संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, "ही तर तुमची अखेरची घरघर! पक्ष गेला, चिन्ह गेले, खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक गेले... जो शिल्लक गट दिसतोय ते घेऊन पत्रकार पोपटलाल जो थयथयाट करीत आहेत, तो म्हणजे त्यांच्या गटाची अखेरची घरघर", अशा उपरोधिक भाषेत शेलारांनी राऊतांना सुनावले. 

"गट केवढा, आणि आवाज केवढा? पण, अखेरच्या घरघरीचा आवाज मोठाच असतो म्हणा ! 2024 नंतर महाराष्ट्रात भाजपा कुठे असेल? याची चिंता तुम्ही करु नका", असा टोलाही शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे. 

"छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाच आणि तुमच्या पक्षा सारख्या बांडगूळाना दिल्ली दाखवली ती सुध्दा भाजपानेच! तुमचा सडकून पराभव अटळ आहे. तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार हे निश्चित आहे. 'हग्रलेख' आजच लिहून ठेवा! तुम्ही तुमच्या गटासाठी नँनो गाडी तेवढी बुक करुन ठेवा", असे म्हणत शेलार यांनी संजय राऊतांचा खोचक शब्दांत समाचार घेतला. 

हेही वाचा >> बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारच?

सामना अग्रलेखातून काय करण्यात आलीये टीका?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी छोट्या पक्षांबद्दल केलेल्या विधानावर सामना अग्रलेखातून भाष्य कऱण्यात आले आहे. 'वापरा आणि फेका! बावनकुळ्यांचा पक्ष राहील काय?', असा सवाल करत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अग्रलेखातून भाजपला सुनावले. नेमकं काय म्हटलंय वाचा...

"बावनकुळे हे भाजपचे एक थिल्लर तसेच सामान्य ज्ञानाची वानवा असलेले नेते आहेत. त्यांचे वक्तव्य तसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, पण बावनकुळ्यांची भाषा ही त्यांची नसून मोदी-शहा-नड्डांच्या भूमिकेचा उद्घोषच ते करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. दोन वर्षांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनीही आगामी काळात शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवू व देशात फक्त एकमेव भाजप हाच पक्ष राहील अशी पिपाणी फुंकली होती. आता बावनकुळे यांनीही तोच सूर पुढे नेला."

"काँग्रेससह अनेक पक्षांतील ‘अनुभवी भ्रष्टाचारी’ नेते भाजपने आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे इतर पक्ष भ्रष्टाचारमुक्त झाले, पण भाजपचे मात्र डबके बनले याचे भान बावनकुळ्यांना आहे काय?"

हेही वाचा >> 'अरे भाजपवाल्यांना आम्ही सरकारमध्ये आणलं', राणा विरुद्ध कडू वाद टोकाला

"भाजप हा परावलंबी पक्ष बनला असून इतरांच्या उधार-उसनवारीवर जगत आहे. ईडी आणि सीबीआयच्या कुबड्यांवर तो टिकून आहे. जे स्वतःच परावलंबी आहेत त्यांनी दुसऱ्यांना संपविण्याची बेताल भाषा करू नये. 2024 च्या निवडणुकीनंतर इतर सगळे पक्ष शाबूत राहतील, पण फडणवीस, बावनकुळ्यांचा भाजप महाराष्ट्रात राहील काय?", असा प्रश्न ठाकरेंच्या सेनेनं करत भाजपला डिवचलं. 

    follow whatsapp