पुणे: इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजिटल वाहिनी मुंबई Tak तर्फे मुंबई Tak जय हिंद उत्सवचं आज (23 मे) पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात देशाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची प्रकट मुलाखत घेण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर यानंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ले चढवले. संयमित असे हल्ले करूनही भारताने पाकिस्तानची लष्करी ताकद ही अक्षरश: खिळखिळी करून टाकली. या सगळ्यादरम्यान लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
'मुंबई Tak जय हिंद उत्सवा'त मनोज नरवणे यांच्या मुलाखतीतून भारत-पाकिस्तानमधील आगामी संबंध, भारतीय लष्कराची भूमिका या सगळ्याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया. ही विशेष मुलाखत Tak चॅनल्सचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर आणि मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी हे घेणार आहेत.
पाहा माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची मुलाखत LIVE
ADVERTISEMENT
