आपल्या बहिणीसोबत भांडण करु नकोस असं सांगणाऱ्या वडिलांची १३ वर्षीय मुलाने चाकू भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या कात्रज परिसरातील जांभुळवाडीमध्ये ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
दस्तगीर इमाम शेख (वय ४०) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो आपल्या मुलाला बहिणीसोबत भांडू नकोस म्हणून बजावत होता. रागावलेल्या १३ वर्षीय मुलाने यानंतर चाकू भोसकून आपल्याच वडीलांना संपवलंय. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
– सविस्तर वृत्त लवकरच
ADVERTISEMENT
