IPL 2025 Suspended: अजिबात नाराज व्हायचं नाही, IPL चाहत्यांसाठी आता BCCI कडून मोठी घोषणा!

IPL 2025 : भारत पाकिस्तान या दोन देशांदरम्यान गेल्या तीन दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमधील धर्मशाळा येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान सुरू असणारा सामना थांबवण्यात आला. याचपार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगबाबत बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. 

बारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर बीसीसीआयची मोठी घोषणा

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर बीसीसीआयची मोठी घोषणा

मुंबई तक

09 May 2025 (अपडेटेड: 09 May 2025, 04:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारत पाकिस्तान या दोन देशांदरम्यान गेल्या तीन दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

point

यामुळे पंजाबमधील धर्मशाळा येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान सुरू असणारा सामना थांबवण्यात आला.

point

याचपार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगबाबत बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. 

IPL 2025 : भारत पाकिस्तान या दोन देशांदरम्यान गेल्या तीन दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात हल्ले करत आहेत. मात्र, भारतानं पाकिस्तानला चांगलंच चोख प्रत्युत्तर दिलंय. 8 मे च्या रात्री अमृतसर, राजस्थानातील पूँछमध्ये हल्ले करण्यात आले. तसेच जम्मू काश्मीरमध्येही हल्ले सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे पंजाबमधील धर्मशाळा येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान सुरू असणारा सामना थांबवण्यात आला. याचपार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगबाबत बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 स्थगित, पुन्हा कधी सुरू होणार?

आयपीएल सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली की, भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तनाव निर्माण झाल्यानं आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 9 मे रोजी याबाबत बीसीसीआयनं सांगितलं आहे. एक आठवडाभर आयपीलला स्थगिती देण्याबाबत निर्णय घेतला असल्याचं बीसीसीआयनं ट्विट करत माहिती दिलीय.

मात्र, त्यानंतर आयपीएल सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची पोस्ट बीसीसीआयनं केलीय. अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यात, आयपीएल गवर्निंग काउंसिलनं हा निर्णय घेतलाय.  यावेळी इतर काही अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत हा निर्णय घेण्यात आलाय. ज्यात अधिकाधीक फ्रेंचायझीनं आपल्या खेळाडूंच्या चिंतेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्यात . 

हेही वाचा :  जम्मू काश्मीरवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा!

बीसीसीआयला देशाच्या सशक्त दलांच्या ताकदीवर आणि पूर्वतयारीवर पूर्ण विश्वास आहे. हे सर्व भागिधारकांच्या सामूहिक हिताचं असल्याचं मंडळानं घेतलेली भूमिका योग्य असल्याचं बोललं जातंय. 

ते पुढे म्हणाले की, या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण परिस्थितीत बीसीसीआईनं देशासोबत आम्ही कणखरपणे उभे आहोत. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दलांसोबत आणि जनतेसोबत एकसंघ असल्याची भूमिका व्यक्त करतो. जे देशाची सेवा करत आहेत. त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या धौर्याला आमचा सलाम, असं ट्विट त्यांनी केलंय. 

 

    follow whatsapp