"माझ्याकडे भाजपची 'ती' फाईल असल्याचं अजितदादांनी सांगितलं, अन् 10 दिवसांत त्यांचा मृत्यू", बड्या नेत्याचा दावा

मुंबई तक

02 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 12:26 PM)

Sanjay Raut on Ajit Pawar : संजय राऊत म्हणाले, मी कोणावरती आरोप करत नाही. मात्र, या लोकांच्या मनातील शंका आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते गंभीर स्वरुपाचे प्रश्न आहेत. त्यांच्यासोबत ओसीडी नाही. त्यामुळे लोकांच्या मनात तशी शंका आहे. अजितदादांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

Sanjay Raut on Ajit Pawar

Sanjay Raut on Ajit Pawar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

"माझ्याकडे भाजपची 'ती' फाईल असल्याचं अजितदादांनी सांगितलं होतं"

point

"भाजपच्या फाईलबाबत बोलले अन्10 दिवसांत त्यांचा मृत्यू", बड्या नेत्याचा दावा

Sanjay Raut on Ajit Pawar : "अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे. मी उघड करेल, असंही त्यांनी सांगितलं होतं. हे सगळं त्यांनी 15 जानेवारी रोजी सांगितलं. त्यानंतर पुढील 10 दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालाय. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया यांची आठवण येते.", असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : '...नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो', 'त्या' विधानाने मोठी खळबळ.. NCP विलिनीकरणावर CM फडणवीस असं का म्हणाले?

संजय राऊत म्हणाले, मी कोणावरती आरोप करत नाही. मात्र, या लोकांच्या मनातील शंका आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते गंभीर स्वरुपाचे प्रश्न आहेत. त्यांच्यासोबत ओसीडी नाही. त्यामुळे लोकांच्या मनात तशी शंका आहे. अजितदादांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच, असे नाही. अजित पवार त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले. त्यांना कदाचित वाटले की भाजप हा आपल्या विचारांचा पक्ष नाही. जर अजित पवारांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. इतर शंभर लोक म्हणतात ते खोटे आणि फडणवीस म्हणतात ते खरे हे चुकीचे आहे. आज दादा नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नयेत.

 अजित दादांचा पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहरांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शाहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला आहे, अशी टीकाही राऊत यांनी केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एकत्र आयुष्य संपवण्याचं प्रेयसीला आश्वासन... विवाहित प्रियकराने भयंकर पद्धतीने काढला काटा! नेमकं काय घडलं?