operation sindhoor : भारतीय सैन्याच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि सोफिया कुरैशी यांची केवळ भारताच नाहीतर जगभरात चर्चा आहे. भारत पाकिस्तान युद्धाची धुरा या दोघींनं पेललीय. ऑपरेशन सिंदूरमध्ये यांची महत्त्वाची भूमिका आहे. अशातच आता अनेकांना व्योमिका सिंह हिच्या लहानपणीच्या किस्स्यांबाबत काहींना माहिती जाणून घ्यायची असेलच. अशाच व्योमिकाच्या आई - वडिलांनी याबाबत माहिती दिलीय.
ADVERTISEMENT
व्योमिका सिंह यांच्या आई वडिलांशी 'युपी तक'ने संवाद साधला असता तिचे अनेक किस्से तिच्या आईनं सांगितलेत. ज्यात तिच्या जीवनाशी आणि तिच्या जडणघडणीबाबत काही किस्से सांगितलेत. जेव्हा व्योमिका इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती तेव्हापासून पायलट बनण्याचं तिचं स्वप्न होतं. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं बीटेकचं शिक्षण घेतलं. त्यानंतर काही वर्षे नोकरीही केली. आपल्या आईला काहीही न सांगता व्योमिकानं एअर फोर्सची परीक्षा दिली होती. त्यानंतर एअर फोर्समध्ये निवड झाल्यानंतर तिनं आईला फोनद्वारे संपर्क साधत माहिती दिली.
हे ही वाचा>> India Pakistan War: मुंबईतील 23 वर्षीय जवान बॉर्डरवर शहीद, पाकिस्तानसोबत लढताना वीरमरण
'व्योमिकासोबत मुलानं मस्ती केल्यास ती थोबडवयाची'
व्योमिका यांची आई करुणा सिंह यांनी युपी तकशी बोलताना सांगितलं की, ती लहानपणापासून अॅक्टिव्ह आणि निर्भीड आहे. डान्स, खेळ, डिबेट प्रत्येक ठिकाणी ती भाग घेत असत. तिच्या आईनं तिच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला की, लहानपणी व्योमिकाला तिच्या बहिणीनं एका खोलीत बंद केलं होतं. त्यानंतर ती एका पाईपवरून उतरत घराबाहेर आली. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकीत झाले होते. त्यांनी पुढं असंही सांगितलं की, व्योमिकाची ज्या मुलांनी छेड काढली किंवा तिच्याशी ज्यांनी मस्ती केली त्यांना ती बदडायची.
हे ही वाचा>> पाकिस्तानने पुन्हा केला मोठा गोळीबार! उरी, पूंछसह या भागात केला हल्ला, PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय ठरलं?
त्यानंतर करुणा सिंह म्हणाल्या की, व्योमिका केवळ आमची लेकच नाहीतर या देशाची लेक आहे. या देशातील सर्व आई -वडिलांना माझं सांगणंय की, मुलींना स्वप्न पाहण्याची संधी द्या. त्यांना मेहनत करण्यापासून रोखू नका. त्यांना हिंम्मत द्या मुली आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील, असं करुणा सिंह म्हणाल्या.
व्योमिकाच्या करिअरविषयी...
विंग कमांडर व्योमिका सिंह या 18 डिसेंबर 2004 मध्ये हवाई दलात दाखल झाल्या होत्या. सध्याच्या घडीला सर्वोत्तम विंग कमांडर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी चेतक आणि चित्तासारखे लढाऊ हेलिकॉप्टर उडवले आहेत. त्या वायुसेनेत सामील झाल्यानंतर 13 वर्षानंतर 2017 रोजी त्यांची विंग कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
ADVERTISEMENT
