उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेलं 21 टन गोमांस पकडलं; पालघर पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई तक

• 05:33 AM • 05 Dec 2021

महाराष्ट्रात गोमांस विक्रीस बंदी असताना पालघर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 21 टन गोमांस जप्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशातील अलिगढमधून हे गोमांस तळोजा येथे नेले जात होते. त्याचवेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी कारवाई करत कंटेनर जप्त केला. तसेच चौघांना ताब्यात घेतलं. राज्यात गोमांस विक्रीस बंदी असताना पालघर पोलिसांनी तब्बल 21 टन गोमांस जप्त केलं […]

MumbaiTak
Google CTA

महाराष्ट्रात गोमांस विक्रीस बंदी असताना पालघर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 21 टन गोमांस जप्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशातील अलिगढमधून हे गोमांस तळोजा येथे नेले जात होते. त्याचवेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी कारवाई करत कंटेनर जप्त केला. तसेच चौघांना ताब्यात घेतलं.

हे वाचलं का?

राज्यात गोमांस विक्रीस बंदी असताना पालघर पोलिसांनी तब्बल 21 टन गोमांस जप्त केलं आहे. या गोमांसाची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील अलिगढमधून हे गोमांस महाराष्ट्रात मुंबईत आणण्यात येत होतं.

मोठ्या प्रमाणात गोमांस घेऊन येणाऱ्या या कंटेनरबद्दलची माहिती पालघर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार बोईसर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई-महामार्गावर ही कारवाई केली. कासा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी हा कंटेनर थांबवला. त्यानंतर पाहणी केली असता, त्यात गोमांस आढळून आलं.

कंटेनर घेऊन जाणाऱ्यांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतलं. गोमांसाचा कंटेनर जप्त करत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, कंटेनरमधील हे गोमांस तळोजा येथे नेण्यात येतं होतं अशी माहिती समोर आली आहे.