पुणे: पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स बस चालकाने बसमध्ये असलेल्या महिलेस बस पळवून नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होतो. याप्रकरणी आरोपी नवनाथ नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून पती, पत्नी काम शोधण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी स्टँड परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. तेवढ्यात ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग हा रतीकांत बंदीचोडे आणि पीडित महिलेस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा,एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार,असे त्यांनी सांगितले.त्या आरोपीवर विश्वास ठेवून दोघे जण बस मध्ये आराम करण्यास गेले. तेवढ्यात पीडित महिलेचा नवरा शौचालय शोधत स्वारगेट बस स्थानकांमध्ये गेला असता, आरोपीने काही क्षणात बस तेथून पळवून नेली आणि तू जर आरडा ओरड केल्यास तुला जीवे मारेल अशी धमकी दिली.
स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज रोड वर, एका बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. त्यानंतर पीडित महिला तिच्या पतीला स्वारगेट परिसरात भेटल्यावर, त्या दोघांनी जाऊन स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
असा केला पोलिसांनी तपास?
पोलिसाने ट्रॅव्हल्स चालकविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपी कर्नाटकसाठी, सातारा हायवेने पसार होत असतानाच पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे, ट्रॅव्हल्सचा बस नंबर शोधून, आरोपीला बंगलोर हायवेवर जेरबंद करण्यात यश आले.
ADVERTISEMENT
