मुंबईत Corona रूग्ण संख्येत पुन्हा घट, बरे होणारे रूग्ण वाढले

मुंबईत दिवसभरात 3876 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 9150 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईसाठी ही बाब नक्कीच समाधानकारक म्हणावी अशीच ठरते आहे. मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने रूग्णसंख्या कमी होते आणि कोरोनामुक्त झालेले लोक वाढत आहेत. तरीही काळजी आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईतल्या Corona रूग्णसंख्येत पुन्हा घट, आदित्य ठाकरे म्हणतात… मुंबईत रूग्ण बरे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:39 PM • 26 Apr 2021

follow google news

मुंबईत दिवसभरात 3876 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 9150 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईसाठी ही बाब नक्कीच समाधानकारक म्हणावी अशीच ठरते आहे. मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने रूग्णसंख्या कमी होते आणि कोरोनामुक्त झालेले लोक वाढत आहेत. तरीही काळजी आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

हे वाचलं का?

मुंबईतल्या Corona रूग्णसंख्येत पुन्हा घट, आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबईत रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 87 टक्के झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 5 लाख 46 हजार 861 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज घडीला मुंबईत 70 हजार 373 अॅक्टिव्ह केसेस आहेत. डबलिंग रेट हा 62 दिवसांवर पोहचला आहे. तर 19 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत ग्रोथ रेट 1.09 टक्के इतका झाला आहे. मुंबईत दिवसभरात 70 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 12 हजार 853 रूग्णांना त्यांचे प्राण कोरोनामुळे गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 28328 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेने कोरोना तपासणीसंदर्भात लागू केले ‘हे’ नियम

मुंबईतील सात दिवसांमधली रूग्णसंख्या आणि मृत्यू

25 एप्रिल पॉझिटिव्ह रूग्ण 5 हजार 542, मृत्यू- 64

24 एप्रिल पॉझिटिव्ह रूग्ण 5 हजार 888 रूग्ण, मृत्यू-71

23 एप्रिल 7 हजार 221 कोरोना रूग्ण, 72 मृत्यू

22 एप्रिल- 7140 कोरोना रूग्ण, 75 मृत्यू

21 एप्रिल 7684 कोरोना रूग्ण, 62 मृत्यू

20 एप्रिल – 7,294 कोरोना रूग्ण, 35 मृत्यू

19 एप्रिल – 7,381 कोरोना रूग्ण, 57 मृत्यू

    follow whatsapp