Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपण जनतेसाठी काय करणार? याबाबत आश्वासन देण्यास केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात महापालिकेच्या उमेदवारांसमोर प्रेझेंटेशन सादर केलंय. यामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी मुंबई महापालिकेची सत्ता आल्यानंतर काय करायचं? याबाबतची माहिती नगरसेवकांसमोर सादर केली. दरम्यान, हीच माहिती शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर यामध्ये सुधारणा करुन मुंबई महानगरपालिकेचा वचननामा मुंबईकरांसमोर सादर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मुंबईकरांसाठी कोणत व्हिजन मांडलं? सर्व मुद्दे जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
आदित्य आणि अमित ठाकरेंनी प्रेझेंटेशनमध्ये मांडलले मुद्दे
मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणा-या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचा-यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार. मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल. पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.
परिवहन - खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास
तिकीट दरवाढ कमी करून रू. 5-10-15-20 फ्लॅट रेट ठेवणार
बेस्टच्या ताफ्यात 10,000 ईलेक्ट्रिक बसेस
900 डबल-डेकर ईलेक्ट्रिक बसेस
जुने मार्ग पुन्हा सुरू करणार
महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास
सार्वजनिक आरोग्य -
मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य
मुंबईत पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये. (Shatabdi Govandi, Shatabdi Kandivali, MT Agarwal Mulund, Bhagwati Borivali, Rajawadi Ghatkopar)
पालिका रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रूग्णांना जेनेरिक औषधे कत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी २४x७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ-टू-होम सेवा.
महापालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरू करणार.
मुंबई महापालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय असेल.
शिक्षण -
पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज
पालिका शाळांच्या जमिनी कदापी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही.
दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी शाळांमध्ये बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज.
सर्व माध्यमांच्या शाळांत 'बोलतो मराठी' उपक्रम राबवणार
मुंबईकरांचा स्वाभिमान
घरकाम करणा-या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला रू.1,500 स्वाभिमान निधी.
कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी, अर्थसाह्य आणि नवीन परवान्यांची तरतूद ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय केले जाईल.
कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त 10 रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी मासाहेब किचन्स.
मुंबईतील आमच्या भगिनींच्या लहान मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाची पाळणाघरं उभी करू.
मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालयं बांधली जातील.
प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग
महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग मोफत.
नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग
वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना
एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी तसंच २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज.
फूटपाथ आणि मोकळ्या जागा
रस्त्यांइतकेच फूटपाथही महत्वाचे आहेत, "Pedestrian First" धोरणाची अंमल बजावणी करून फुटपाथ पेव्हर ब्लॉक-फ्री आणि दिव्यांग-स्नेही करणार शब्दांचा खेळ करून मुंबईतील मोकळ्या जागा आणि विशेषतः महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल आणि अन्य मोकळ्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना आंदण दिल्या जाणार नाहीत.
मुंबईकरांना मोकळा श्वास
गेल्या तीन वर्षांत वाढलेले प्रदूषण तातडीने कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करणार.
हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई बांधकाम पर्यावरणीय व्यवस्थापन (एमसीईपी) योजना अंमलात आणणार.
अनियंत्रित विकासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल तसंच मुंबईतील कांदळवनं आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही.
100 युनिटपर्यंत वीज मोफत
घरगुती वीज वापर करणाऱ्या 'बेस्ट विद्युत'च्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार
प्रत्येकाला पाणीहक्क
डिसॅलिनेशन प्रकल्प उभारणार. एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करणार, नवीन इमारतींमध्ये rainwater percolation pits आणि मुंबईत काही ठराविक जागी rain water holding tanks साकरणार.'सध्याच्या अत्यल्प दरातच' मुंबईकरांना, मग तो टॉवरमध्ये राहणारा असो की वस्ती-पाड्यात, प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारच.
मुंबई महापालिकेतर्फे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल.
पाळीव पशुंसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट अॅम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरीयम
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











