Super Exclusive: मुंबईचा महापौर कोण होणार.. मराठी की अमराठी?, मुंबई Tak च्या महाचावडीवर CM फडणवीसांनी केलं घोषित

CM Devendra Fadnavis on Marathi Mayor: मुंबई महापालिकेत महापौर हा हिंदू-मराठीच होईल असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई Tak च्या महाचावडीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महापौर पदाच्या प्रश्नाला थेट उत्तर दिलं आहे.

mayor of mumbai will be a hindu marathi cm devendra fadnavis makes a big announcement on mumbai tak mahachavadi bmc election 2026

मुंबई Tak महाचावडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

02 Jan 2026 (अपडेटेड: 02 Jan 2026, 02:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबई Tak ची महाचावडी

point

मुंबईच्या महापौरपदाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा

point

पाहा मुंबईच्या महापौराबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले

मुंबई: 'मुंबईचा महापौर खान होईल..' असं विधान मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. तेव्हापासून मुंबईत नेमका कोणता महापौर होईल यावरून अक्षरश: रणकंदन माजलं आहे. मुंबईचा महापौर मराठीच होईल असं शिवसेना UBT आणि मनसे ठासून सांगत असताना याच मुद्द्यावरून त्यांनी भाजपला खिंडीत गाठण्याचा बराच प्रयत्न केला. त्यानंतर भाजपने मुंबईत हिंदू महापौर होईल असं म्हणत या मुद्द्याला आणखी हवा दिली. मात्र, आता याबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठं विधान केलं आहे. 

हे वाचलं का?

'मुंबई Tak च्या महाचावडी'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना थेट उत्तरं दिलं. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबईत महापौर कोणाचा होईल या प्रश्नालाही थेट उत्तर दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलं आहे. अशावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई Tak च्या टीमसोबत मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रोतून प्रवास करत दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांना वेगवेगळ्या मुद्यांवर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना मुंबईच्या महापौरपदाबाबत देखील विचारण्यात आलं. पाहा तेव्हा मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले.

 

'मुंबई Tak च्या महाचावडी'मध्ये मुख्यमंत्री फडणवीस मुंबईच्या महापौर पदाबाबत नेमकं काय म्हणाले?

प्रश्न: पण कसंय.. आता कृपाशंकर सिंह म्हणतात की, उत्तर भारतीय महापौर  झाला तर काय चुकीचं आहे?

मुख्यमंत्री फडणवीस: एक तर कृपाशंकर सिंह कुठे म्हणाले.. मीरा-भाईंदरमध्ये म्हणाले.. मुंबईत नाही म्हणाले. दुसरं.. कृपाशंकर सिंह हे आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? 

आता यांच्याकडे कोणी काही बोलतं.. तुम्ही आपलं मीरा-भाईंदरचं काढलं आणि मुंबईत दाखवलं. तुम्ही फार हुशार लोकं आहात. म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल.

असं थेट उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे. त्यामुळे आतापर्यंत विरोधकांकडून ज्या मुद्द्यावर CM फडणवीस आणि भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत होतं. तोच मुद्दा मुख्यमंत्र्यांनी अगदी प्रचाराच्या सुरुवातीलाच परतवून लावला आहे.

हे ही वाचा>> महामुंबईची महाचावडी: CM देवेंद्र फडणवीसांची मराठी माध्यमातील पहिली Super Exclusive मुलाखत लवकरच मुंबई Tak वर!

कुठे पाहता येईल मुख्यमंत्री फडणवीसांची महाचावडी?

अशाच उत्तरासह आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण Super Exclusive मुलाखत आज (2 जानेवारी 2026) सांयकाळी 5 वाजता मुंबई Tak च्या यूटयूब चॅनलवर पाहता येईल. तसंच मुंबई Tak ची वेबसाईट www.mumbaitak.in वर देखील संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी वाचता येईल.

    follow whatsapp