महामुंबईची महाचावडी: CM देवेंद्र फडणवीसांची मराठी माध्यमातील पहिली Super Exclusive मुलाखत लवकरच मुंबई Tak वर!

CM Devendra Fadnavis Mahachavadi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबई Tak ला मराठी माध्यमातील पहिली Super Exclusive मुलाखत दिली. जी तुम्हाला लवकरच मुंबई Tak च्या यूट्यूबवर पाहता येईल.

cm devendra fadnavis first super exclusive interview in marathi media will be coming soon on mumbai tak youtube channel mahachavadi bmc election 2026

CM देवेंद्र फडणवीसांची मराठी माध्यमातील पहिली Super Exclusive मुलाखत

मुंबई तक

• 10:29 PM • 01 Jan 2026

follow google news

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसह (BMC Election) राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. अनेक वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुकांना यंदा प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातही मुंबई महापालिकेवर नेमका कोणाचं झेंडा फडकणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईवर आपलाच झेंड फडकविण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. अशावेळी मुंबई जिंकण्यासाठी भाजपची नेमकी रणनीती काय, मुंबईच्या विकासाचं व्हिजन काय? या सगळ्या गोष्टी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुंबई Tak च्या महाचावडी'वर अगदी सविस्तरपणे सांगितल्या. 

हे वाचलं का?

नववर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak च्या टीमसोबत एक्स्क्लुझिव्ह गप्पा मारल्या. आतापर्यंत कधीही न झालेल्या फॉर्मेटमध्ये मुख्यमंत्र्यांची महाचावडी पार पडली. मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो हा मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. जो फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्ममध्ये सुरू केला होता. हीच मेट्रो आता नुकतीच सुरू झाली असून मुंबईकर देखील याला भरभरून प्रतिसाद देत आहे.

हे ही वाचा>> मतदानापूर्वीच दोन नगरसेविका निवडून आल्या, रवींद्र चव्हाणांचा आनंद गगनात मावेना! थेट देवेंद्र फडणवीसांना फोन

याच अंडरग्राऊंड मेट्रोमधून प्रवास करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि संपूर्ण टीमशी दिलखुलास गप्पा मारल्या. सीएसटीएम मेट्रो स्थानक ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकापर्यंत झालेल्या या गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील विकासाचं व्हिजन ते राज्यातील राजकीय उलथापालथी या सगळ्या प्रश्नांवर अतिशय मनमोकळी उत्तरं दिली.

कुठे आणि कधी पाहता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाचावडी?

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाचावडी ही आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. ही संपूर्ण मुलाखत आपल्याला उद्या (2 जानेवारी 2026) सायंकाळी 5.00 वाजता पाहता येईल.

पाहा महामुंबईच्या महाचावडीचा Super Exclusive प्रोमो

    follow whatsapp