'शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे म्हणता अन् तुमची यादी पाहिली तर...', मुरलीधर मोहोळांचा अजितदादांवर हल्लाबोल

Muralidhar Mohol attacks Ajit Pawar : मुरलीधर मोहोळ म्हणाले, राजकारणात गुन्हेगारांना कोणतेही स्थान नसावे. निवडणुकीच्या मैदानात इतर काही पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना संधी दिली आहे. मात्र भाजपने तसे केलेले नाही. कोणाला तिकीट दिले आहे, हे पुणेकर नीट पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते उत्तर ते मतपेटीतून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Muralidhar Mohol

Muralidhar Mohol

मुंबई तक

02 Jan 2026 (अपडेटेड: 02 Jan 2026, 11:50 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे म्हणता अन् तुमची यादी पाहिली तर..."

point

मुरलीधर मोहोळांचा अजितदादांवर हल्लाबोल

Muralidhar Mohol attacks Ajit Pawar, पुणे : "शहरातून गुन्हेगारी हद्दपार झाली पाहिजे,’ असे पालकमंत्री अजित पवार सांगतात. पण त्यांच्या पक्षाच्या उमेदवारी यादीकडे पाहिले, तर ही भूमिका नेमकी कोणत्या तत्त्वात बसते, हे त्यांनीच स्पष्ट करावे", असा टोला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लगावला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी जोरदार टीका केली. त्याचवेळी भाजपनेही अशाच पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील एका महिलेला उमेदवारी दिल्याचा आरोप झाल्यावर, ‘त्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही,’ असे स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिले.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपने सुरू केलेल्या ‘माध्यम कक्षा’चे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : नांदेड: विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात गेला, मनात सुडाची भावना अन् जामीनावर सुटल्यानंतर पीडितेच्या पतीलाच जाळलं...

मुरलीधर मोहोळ म्हणाले, राजकारणात गुन्हेगारांना कोणतेही स्थान नसावे. निवडणुकीच्या मैदानात इतर काही पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना संधी दिली आहे. मात्र भाजपने तसे केलेले नाही. कोणाला तिकीट दिले आहे, हे पुणेकर नीट पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते उत्तर ते मतपेटीतून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेसोबतच्या युतीबाबत बोलताना मोहोळ यांनी भाजपची भूमिका अजूनही सकारात्मक असल्याचे सांगितले. मागील निवडणुकीत भाजपचे 105 नगरसेवक निवडून आले होते. तरीदेखील शिवसेनेसोबत युती करण्याची तयारी भाजपने दर्शवली होती. शिवसेनेच्या जागा तुलनेने कमी असतानाही त्यांच्या कडून अधिक जागांची मागणी होत होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जागावाटपावर मतभेद असू शकतात, पण युती व्हावी, अशीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने हा विषय वरिष्ठांकडे गेला आहे. शिवसेनेने तब्बल 150 उमेदवारी अर्ज का भरले, हा प्रश्न आहे. आम्ही शिवसेनेला 16 जागा देण्यास तयार आहोत. काही जागांबाबत अडचण असेल, तर त्यावर वरिष्ठ पातळीवर तोडगा निघेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आठ जागा देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नांदेड: विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात गेला, मनात सुडाची भावना अन् जामीनावर सुटल्यानंतर पीडितेच्या पतीलाच जाळलं...

 

    follow whatsapp