अतुल सावे अन् भागवत कराड यांची गाडी रोखत शिवीगाळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा

Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election : संतप्त कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी अडवून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाहनाला काळे फासून निषेध नोंदवण्यात आला. काही वेळासाठी परिसर अक्षरशः तणावपूर्ण बनला होता. आंदोलन अधिक चिघळलं असतानाच एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election :

Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election :

मुंबई तक

31 Dec 2025 (अपडेटेड: 31 Dec 2025, 12:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अतुल सावे अन् भागवत कराड यांची गाडी रोखत शिवीगाळ

point

निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडल्याने तुफान राडा; कार्यकर्त्यांनी घेरलं

Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election ,छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान सेना-भाजप युती तुटल्यानंतर आता भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट भाजप नेत्यांना घेरण्यास सुरुवात केलीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते थेट नेत्यांविरोधात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातत वरिष्ठ नेत्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचं चित्र दिसून आलं.

हे वाचलं का?

भाजप नेत्यांची गाडी अडवत शिवीगाळ, तुफान राडा 

संतप्त कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी अडवून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाहनाला काळे फासून निषेध नोंदवण्यात आला. काही वेळासाठी परिसर अक्षरशः तणावपूर्ण बनला होता. आंदोलन अधिक चिघळलं असतानाच एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिस संरक्षणात अतुल सावे आणि भागवत कराड यांनी घटनास्थळावरून माघार घेतली.

उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी नेतृत्वावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. “सर्व्हे आमच्या बाजूने असूनही आम्हाला डावलण्यात आलं”, “नेत्यांच्या पीए आणि नातेवाईकांना तिकीट दिलं जातंय”, असे आरोप करत कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांचे फोटो फाडले. काही संतप्त कार्यकर्त्यांनी एकेरी उल्लेख करत जोरदार शिवीगाळ केल्याचंही यावेळी पाहायला मिळालं.

हेही वाचा : मोठी बातमी : महापालिका निवडणुकीत भाजपने खाते उघडले, मतदानापूर्वीच दोन नगरसेविका विजयी

“आमचं सर्वे दाखवा, न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अतुल सावे यांनी विशिष्ट समाजालाच पुढे केल्याचा, तर भागवत कराड यांनी जातीच्या आधारावर उमेदवारी वाटप केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. “जर सर्व्हेत माझं नाव नसेल तर आयुष्यभर गुलामी करीन,” अशा टोकाच्या प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिल्या, ज्यातून असंतोषाची तीव्रता स्पष्ट झाली.

भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत कार्यकर्त्यांनी वाहनावर काळं फासलं. या आंदोलनात महिला कार्यकर्त्याही आक्रमक झाल्याचं चित्र होतं. “भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही,” अशा शब्दांत त्यांनी नेतृत्वावर निशाणा साधला. “आमच्या घरी हे नेते प्रचारासाठी येत होते, लाखो रुपये खर्च केले, शेवटपर्यंत आश्वासन दिलं; पण ऐनवेळी तिकीट नाकारलं,” असा आरोप संतप्त महिला कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान, “मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, रात्रंदिवस पक्षासाठी काम केलं, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला,” असा आरोप भदाने पाटील या कार्यकर्त्याने केला. “मला अंधारात ठेवलं गेलं; आता काही अनुचित घडलं तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल,” असा इशाराही त्याने दिला. दुसरीकडे, उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या सुवर्णा मराठे यांनी थंडीतही प्रचार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. एकूणच, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून, हा असंतोष आगामी राजकारणासाठी धोक्याची घंटा ठरतोय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ठाणे : उमेदवारी अर्ज भरताना धावपळ अन् तणाव, परतताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू